आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असाममध्ये संशयित दहशतवाद्यांबरोबर चकमक, 3 जवान शहीद, 4 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिनसुकिया - आसाममधील तिनसुकिया येथे संशयित दहशतवाद्यांबरोबर लष्कराची चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांनी स्फोटात लष्कराची गाडी उडवून लावली. त्यानंतर चकमकीत लष्कराचे तीन जवान शहीद जाले. आसामचे डीजीपी मुकेश सहाय यांनी सांगितले की, एका जखमीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जवानांची चकमक अजूनही सुरूच असून चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

उल्फाने घडवला स्फोट...
- तिनसुकियाच्या डिगबोई परिसरात जवान आणि संशयित दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
- रिपोर्ट्सनुसार उल्फाने लष्कराची एक गाडी स्फोटात उडवल्याचा संशय आहे.
- असामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवाल यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.
- ते म्हणाले, दहशतवाद्यांना कठोर धडा शिकवायला हवा. अधिकाऱ्यांना तिनसुकियाला जाण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजनाथ यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा..
- असाममध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री सोनवाल यांच्याशी चर्चा केली.
- या संपूर्ण घटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाचे लक्ष असल्याचेही राजनाथ यांनी सांगितले.
- जवान शहीद झाल्याच्या वृत्ताने दुःख झाल्याचेही राजनाथ म्हणाले. जवान लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...