आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्षाबंधनास आलेल्या जवानांनी काढली 16 विद्यार्थिनींची छेड, कृत्य पाहून मुलींना काेसळले रडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दंतेवाडा- छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील बस्तरमधील एका शाळेत गत ३१ जुलैला रक्षाबंधनाच्या कार्यक्रमास अालेल्या सीअारपीएफच्या जवानांनी १६ विद्यार्थिनींना एक-एकटे गाठून छेड काढली. पालनारच्या राजीव गांधी शिक्षण संस्था संचलित मुलींच्या निवासी शाळेतील ही घटना आहे.  

पालनार गावात असलेल्या निवासी शाळेत ५०० अादिवासी मुली शिक्षण घेत अाहेत. या शाळेत ३१ जुलै राेजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अायाेजित करण्यात अाला हाेता. या कार्यक्रमास सीअारपीएफचे सुमारे १०० जवान अाले हाेते. यातील काही जवानांनी विद्यार्थिनींची छेड काढली. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच, दोन जवानांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

एका विद्यार्थिनीने यासंदर्भात माहिती देताना सांगितले, ३१ जुलै रोजी १६ विद्यार्थिनींशी जवानांनी अश्लील कृत्य केले. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थिनीने सांगितले, ती एकटीच वॉशरूममध्ये गेली होती. तेव्हा तेथे आधीपासूनच उपस्थित असलेल्या जवानाने तिची झडती व चौकशी करणार असल्याचे सांगितले. वॉशरूमला जाऊन आल्यानंतर झडती घेऊ, असे तो म्हणाला. 

विद्यार्थिनी परत आल्यानंतर तिला भिंतीजवळ हात वर करण्यास सांगून अश्लील चाळे सुरू केले. जवानाचे कृत्य सांगताना तिला रडू कोसळले. तिने त्याला विरोध करताच सोडून दिले. मात्र, या घटनेची वाच्यता तिने कोणाजवळही केली नाही. 

काही वेळाने तीन विद्यार्थिनी वॉशरूमकडे गेल्या. जवानाने त्यांनाही धमकावले. तुम्ही काय करता? हे आम्हाला ठाऊक आहे. झडती घेऊ न दिल्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगू असेही धमकावले. एक विद्यार्थिनी जवानाच्या चाळ्याला घाबरून रडू लागली.  रडताना पाहून तिला त्याने सोडून दिले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी सौरभ शुक्ला आणि पोलिस अधीक्षक कमलोचन कश्यप यांनी विद्यार्थिनींची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. पोलिस तपास सुरू आहे. 

वातावरण असे बिथरले
विद्यार्थिनींनी सांगितले, ज्या जवानांनी असे अश्लील कृत्य केले त्यांनी राखी बांधून घेतलेली नव्हती. ३१ जुलै रोजी एका खासगी दूरचित्रवाहिनीने सीआरपीएफच्या जवानांचा आणि विद्यार्थिनींच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेच्या मैदानावरील कार्यक्रमास निवासी शाळेच्या ५६० विद्यार्थिनी आणि प्री मॅट्रिक कन्या वसतिगृहाच्या १५० विद्यार्थिनी व सीआरपीएफच्या दोन वेगवेगळ्या बटालियनचे सुमारे १०० जवान उपस्थित होते. एकाएकी पाऊस सुरू झाला. तेव्हा विद्यार्थिनी व जवान संस्थेच्या व्हरांड्यात बसले. पाऊस सुरू असताना विद्यार्थिनीस वॉशरूमला जाताना पाहून तो जवान तेथे आला.

घटना अशी आली उघडकीस
घाबरलेल्या मुलींनी ही बाब अधीक्षकांना सांगितली नव्हती. यातील एका विद्यार्थिनीला वाटले की तिच्यासोबतच असे झाले असावे.  परंतु संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी इतर मैत्रिणींची माहिती कळली. या सर्वांनी संस्थेच्या प्रमुख दिव्या सिन्हा यांना सांगितले.  दिव्यांनी अधीक्षिका द्रौपदी सिन्हा यांच्या कानावर प्रकरण टाकले. अधीक्षिकांनी दोन वरिष्ठांना ही माहिती दिली.

कार्यक्रम स्थळापासून १५ मीटर दूर अंतर
ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या ठिकाणापासून वॉशरूम अंदाजे १५ मीटर दूर आहे. वॉशरूमपासून ५ मीटर दूर अंतरावर जवानांनी झडतीच्या नावाखाली अश्लील चाळे केले. 
बातम्या आणखी आहेत...