आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरक्षा रक्षकांनी वर्षभरात ठार मारले 190 दहशतवादी, मारलेल्यांपैकी 110 दहशतवादी पाकिस्तानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - भारतीय लष्कराने या वर्षी 190 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. मारलेल्यांपैकी 110 दहशतवादी हे परदेशातून (प्रामुख्याने पाकिस्तानातून) आले होते. बांदीपोराच्या हाजिन सेक्टरमध्ये लष्कराच्या जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट बीएस संधू यांनी शनिवारी ही माहिती दिली. हाजिन सेक्टर परिसरात सैनिकांनी लश्कर ए तोयबाच्या 6 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. यात मुंबई हल्ल्याचा प्रमुख आरोपी जकी उर्रहमान लखवीचा पुतण्यात औवैज उर्फ उस्मान जंगी याचाही समावेश आहे. 

 

> बीएस संधू यांनी सांगितल्याप्रमाणे, "ठार झालेल्या 110 दहशतवाद्यांमध्ये 66 घुसखोर होते. ते लाइन ऑफ कंट्रोल ओलांडून घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना कुंपणांजवळच ठार मारण्यात आले. या 66 जणांव्यतिरिक्त उर्वरीत दहशतवाद्यांना काश्मिरात विविध ठिकाणी एनकाउंटरमध्ये ठार मारण्यात आले. या लष्करी मोहिमांचा चांगला परिणाम होत आहे. लष्कराच्या चोख सुरक्षा बंदोबस्त आणि कारवायांमुळे घुसखोरीचे प्रमाण कमी झाले आहे. 
> हाजिन परिसरात जवळपास दररोज शोध मोहिम राबवली जात आहे. यात सीआरपीएफ आणि लष्करासह पोलिसांच्या तुकड्या देखील ठिक-ठिकाणी धडक कारवाया करत आहेत. अशाच प्रकारच्या एका कारवाईमध्ये लश्कर ए तोयबाचे 6 दहशतवादी ठार मारले गेले असेही संधू यांनी स्पष्ट केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...