आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाची गोपनीय योजना 'लीक', लेफ्टनंट जनरलसह 6 अधिका-यांवर संशय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय थलसेनेत एक धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इशान्‍येकडे चीनच्‍या सीमेवर जवानांची तैनाती आणि युद्ध रणनीतीच्‍या अतिशय गोपनीय योजना लीक झाल्‍याचा प्रकार उघड झाला आहे. हा प्रकार दोन वर्षांपूर्वीचा असून तेजपूर येथे घडला होता.

तेजपूर येथील तुकडीने पाठविलेले गोपनीय पत्र हरविले होते. अजूनपर्यंत ते सापडलेले नाही. याप्रकराची गंभीर दखल घेण्‍यात आली असून सैन्‍याने चौकशी सुरु केली आहे. याप्रकरणी एक लेफ्टनंट जनरल आणि पाच इतर अधिका-यावर संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे. कोर्ट ऑफ इन्‍क्वायरीमध्‍ये या सहा अधिका-यांना प्राथमिक चौकशीत हलगर्जिपणा केल्‍यावरुन दोषी ठरविण्‍यात आले आहे. या अधिका-यांवर प्रशासनिक कारवाई होऊ शकते किंवा कोर्ट मार्शलही करण्‍यात येऊ शकते. अर्थात हे त्‍यांच्‍यावर लावण्‍यात आलेल्‍या आरोपांवर अवलंबून राहील.