आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Major Dies During Tank Exercise In Pokhran, Probe Ordered. News In Marathi

पोखरणच्या मिल्ट्री एक्सरसाइज कॅम्पमध्ये फुटला तोफगोळा, मेजर शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- राजस्थानातील पोखरण येथे सुरु असलेल्या लष्कराच्या एक्सरसाइज कॅम्पमध्ये टँक फायरिंगच्या सरावादरम्यान गोळा फुटून झालेल्या दुर्घटनेत एक मेजर शहीद झाले. तसेच अनेक जवान जखमी झाले आहेत. जैसलमेर जिल्ह्यातील पोखर फिल्ड फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी रात्री ही दुर्घटना घडली.

लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात मोठ्या पोखरण फिल्ड 75 आर्म्ड यूनिट टँक फायरिंगचा सराव सुरु आहे. मंगळवारी रात्री टँकमधील गोळा निघाल्यानंतर जागेवरच फुटला. यात हरियाणा येथील रहिवासी मेजर ध्रुव यादव (32) यांचा जागेवरच मृत्यू झाला. लष्कराचे प्रवक्ता लेफ्टिनेंट कर्नल मनीष ओझा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. लष्कराने 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत.

पोखरण फायरिंग रेंज देशातील सर्वात मोठे रेंज समजले जाते. लष्कराचे विविध यूनिट्स मिलिट्री एक्सरसाइज कॅम्पमध्ये सहभागी होत असतात.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, मेजर ध्रुव यांची पत्नी आहे गरोदर...