आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल वापरण्यास रोखले म्हणून जवानाने मेजरला AK-47 ने केले शूट, जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाईल वापरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. (फाईल) - Divya Marathi
मोबाईल वापरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. (फाईल)
श्रीनगर - बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये एका जवानाने आपल्याच मेजरला गोळ्या झाडून ठार मारले आहे. मोबाईल वापरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. मेजरने ऑन ड्युटी मोबाईल वापरणाऱ्या जवानाला रोखताना तो जप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संबंधित जवानाचा मोबाईल खाली पडला. याच रागाच्या भरात जवानाने मेजरला शूट केले. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. संरक्षण दलाने याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 
 
 
एके-47 ने केली फायरिंग
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मेजरचे नाव शिखर थापा असे होते. ते 8 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनमध्ये तैनात होते. तपासादरम्यान त्यांना एक जवान ऑन ड्युटी मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले. त्यांनी जवानाला मोबाईल वापरू नये असे सांगितले. यावर दोघांमध्ये वाद सुरू झाला. मेजरने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोबाईल खाली पडला. यावर चिडलेल्या जवानाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर एके-47 रायफलने गोळीबार केला.
 
मेजरला तत्काळ रुगणालयात हलवण्याची तयारी करण्यात आली. मात्र, रुगणालयात पोहचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बातम्या आणखी आहेत...