आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: सैन्य भरतीत घोटाळा, वैद्यकिय तपासणीत अनुत्तिर्ण 17 उमेदवारांची नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - भारतीय सैन्य भरतीतील गंभीर घोटाळा उघडकीस आला आहे. मागील वर्षी झारखंडमध्ये झालेल्या सैन्य भरती दरम्यान वैद्यकीय तपासणीत नापास झालेल्या 17 उमेदवारांना नियुक्त करण्यात आले होते. यामधील चार जवानांची पोस्टींग करण्यात आली, तर घोटाळा उघडकीस आल्यानंतर 13 जवानांची पोस्टींग थांबवण्यात आली होती. पोस्टींग झालेल्या चार जवानांमधील दोघांना नुकतेच निलंबित आले आहे, तर इतर दोघांवरील निलंबनाची प्रक्रिया चालू आहे. सैन्याच्या दीपाटोली येथील मुख्यालयाच्या आदेशानुसार या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.
हा घोटाळा रांची येथील भरती बोर्ड कार्यालयात उघडकीस आला. बोर्डाचे संचालक प्रमाणपत्रांची तपासणी करत असताना त्यांना काही प्रमाणपत्र खोटे असल्याची शंका आली. त्यांनी या प्रमाणपत्रांना नामकुम येथील सैन्य रुग्णालयात पाठवले, तेव्हा या प्रमाणपत्रांवरील स्वाक्षर्‍या आणि शिक्का खोटा असल्याचे उघड झाले. या सर्व उमेदवारांना डॉक्टरांनी सुरूवातीलाच नापास केले होते.

असा झाला घोटाळा
फेब्रूवारी 2013 मध्ये सरायकेला, मार्चमध्ये हजारीबाग आणि सप्टेंबरमध्ये रांची येथे जवानांची भरती करण्यात आली. धावण्याच्या चाचणीनंतर या जवानांची आरोग्य तपासणी नामकुम येथील सैन्य रुग्णालयात करण्यात आली. या दरम्यान डॉक्टरांच्या बोर्डाने 17 उमेदवारांना अनफिट असल्याचे सांगत नापास केले. मात्र भरती कार्यालयामध्ये जे प्रमाणपत्र पाठवण्यात आले होते, त्यामध्ये या सर्वांनी आरोग्य तपासणी उत्तीर्ण केलेली होती. या सर्व प्रमाणपत्रांवर त्याच डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या आणि शिक्का होता, ज्यांनी त्यांना अनफिट म्हणून घोषीत केले होते.
यांचे प्रमाणपत्र खोटे होते...
रघुवीर सिंह, अवध कुमार, पप्पू कुमार यादव, संतोष टोप्पो, जयपाल मुंडा, कमलदेव महतो, अरविंद कुमार साह, पंकज कुमार महतो, जीवन किस्पोट्टा, रंजीत महतो, उमेश उरांव, कुंदन कुमार, समीर मुंडा, कोसमस बोदरा, प्रभु भगत, उमेश उरांव आणि अजय स्वांसी या जवानांची प्रमाणपत्रे बनावट आढळली.
पुढील स्लाईडवर वाचा... या जवानांचे होणार कोर्टमार्शल