आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता केबीसीच्या धर्तीवर लष्करात भरती होणार, कॉम्प्युटर बेस्ड एंट्रन्स टेस्ट सेंटर तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा (राजस्थान) - मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या धर्तीवर आता लष्करातील भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्या भरती परीक्षेला कॉम्प्युटर बेस्ड एंट्रन्स टेस्ट (सीबीईटी) असे नाव देण्यात आले आहे.

लष्करातील या नवीन भरती प्रक्रियेची सुरुवात कोटामधून होणार आहे. या सेंटरमध्ये परीक्षार्थींना ओएमआर शीटवर चेंडू काढण्याऐवजी संगणकाच्या पडद्यावर योग्य उत्तराची निवड करावी लागणार आहे. त्यासाठी योग्य पर्यायावर क्लिक करावे लागेल. परीक्षेनंतर प्रश्नांची उत्तरे संगणकाद्वारे तपासली जातील. त्याचबरोबर परीक्षार्थींना तातडीने आपला निकालदेखील समजणार आहे. तो लगेच जाहीर केला जाईल. त्यानुसार गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. कोटाशिवाय जोधपूर, झुंझुनू, अलवरमध्येही अशा प्रकारचे सेंटर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान, कोटामध्ये २०१५ मध्ये भरतीच्या नव्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी हॉल तयार करण्यात आला आहे. सध्या ४० संगणक लावण्यात आले आहेत. या अगोदर लष्करी भरती प्रक्रियेवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. नवीन पद्धती अतिशय पारदर्शी आहे. त्यामुळे यापुढे भरतीवर प्रश्नचिन्ह लागणार नाही.

जयपूरमध्ये झाला प्रयोग
राजस्थान लष्करात सीबीईटी सिस्टिमने भरती परीक्षा घेण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे; परंतु हा प्रयोग केवळ नर्सिंग सहायक या पदांसाठी करण्यात आला होता. या पदासाठी याच पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती.

पारदर्शी पद्धत : संगणकावर विचारण्यात येणारी प्रश्ने आगामी १५ वर्षांत उमेदवारांना पुन्हा कधीही विचारले जाणार नाहीत, अशा प्रकारची ही नवीन प्रणाली आहे, असा दावा करण्यात आला आहे. पुनरावृत्ती होणार नसल्याने कोणत्याही प्रकारच्या पेपरफुटी किंवा अगोदरच प्रश्न फुटण्याची शक्यता नाही. कॉम्प्युटरच्या रँडम पद्धतीमुळे गोपनीय डेटा संगणकात फीड करून सील करण्यात येणार आहे, अशी माहिती कोटाच्या सैन्य भरती कार्यालयाचे संचालक कर्नल कमल उप्रेती यांनी दिली.

५७५ कोटींच्या आकाश क्षेपणास्त्र सौद्याचा सीबीआय तपास बंद
कोट्यवधींच्या आकाश क्षेपणास्त्राशी संबंधित एका सौद्यात झालेल्या घोटाळ्याचा तपास सीबीआयने बंद केला आहे. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे पुरावे आढळून न आल्याने तपास संस्थेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. भारत डायनामिक्स लिमिटेडने (बीडीएल) आकाश मिसाइल सिस्टिम कंपोनेंट्सच्या उत्पादनासाठी टाटा पॉवरला ५७५ कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. करारानुसार कंपनीने लष्कराच्या दोन तुकड्यांना त्याचा पुरवठा करण्याचे ठरले होते. दरम्यान, हवामान खराब असतानाही आकाश क्षेपणास्त्र लक्ष्य भेद करू शकते. १८ किलोमीटर उंच आणि ३० किलोमीटरवरील विमानाला लक्ष्य करण्याची क्षेपणास्त्राची क्षमता आहे.