आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Army Says Barack Obamas India Visit Terrorist May Attack On School And Other Public Place

ओबामांच्या भारत दौर्‍याआधी शाळांना लक्ष्य करण्याच्या तयारीत 200 दहशतवादी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतीय प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यांच्या भारत दौर्‍याआधी 200 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. लष्कराने म्हटले आहे, की ओबामांच्या दौर्‍याआधी शाळा आणि सार्वजनिक स्थळांना लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा इरादा आहे. नागरी वस्तीवर हल्ला करुन दहशत पसरविण्याची ही खेळी आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी लष्कराने शोपियां जिल्ह्यात सहा दहशतवाद्यांना घेरले आहे. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरु आहे. शोपियां जिल्ह्यात सुरु असलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे वृत्त आहे. मात्र अजूनही चार दहशतवादी लपून फायरिंग करत आहेत. याभागात लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
सीमेपलिकडे पाकिस्तानच्या 36 वॉर रुम
जनरल ऑफिसर कमांडर 16 कोरचे लेफ्टेनेंट जनरल के.एच.सिंह यांनी म्हटले आहे, की दहशत पसरविण्यासाठी दहशतवादी कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत व्हावी यासाठी सीमेपलिकडे पाकिस्तानने 36 लाँच पॅड तयार केल्याचा दावा लष्कराने केला आहे. या लाँच पॅडचा उपयोग वॉर रुमसारखा केला जात आहे. येथे शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आहे. येथूनच पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतात दहशत पसरवण्यासाठी पाठवण्याचा प्रयत्न करत आहे. पीर पंचल येथून विशेषतः घुसखोरी केली जात आहे.
भारतीय लष्कर कोणत्याही स्थितीत लढण्यास सज्ज असल्याचे लष्कराने म्हटले आहे. एलओसीवरील लष्कराच्या सतर्कतेमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठी घुसखोरी होऊ शकलेली नाही.

फोटो - बुधवारी सोपोर येथे दहशतवाद्यांवर निशाणा लावलेला भारतीय जवान

पुढील स्लाइडमध्ये, शोपियां येथील भारतीय जवान