आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरे कारगिल होऊ देणार नाही, लष्कर प्रमुख सुहाग यांनी दिली ग्वाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्रास (लेह) - भारतीय लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग यांनी देशात पुन्हा कारगिल होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. शनिवारी कारगिल युद्धातील शहिदांना त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
रविवारी कारगिल विजय दिवस साजरा केला जाणार आहे. यासंबंधीत कार्यक्रम 20 तारखेपासून सुरु झाले आहेत. मुख्य कार्यक्रम रविवारी अमर जवान ज्योती येथे होणार आहे. या कार्यक्रमात देशाचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर सहभागी होतील. द्रास येथे कारगिल विजय दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमात धार्मिक गुरुंना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. रविवारी येथे रोषणाई केली जाईल. या कार्यक्रमासाठी शहिदांच्या पत्नींनाही आमंत्रित केले गेले आहे.
कारगिल युद्ध
1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये कारगिल युद्ध झाले होते. जवळपास दोन महिने हे युद्ध चालेल होते. पाकिस्तानी सैनिकांनी येथील उंच पाहाडांवर बंकर तयार केले होते. भारतीय लष्काराने त्यांना चोख उत्तर दिले आणि कारगिलवर विजय मिळविला होता. या युद्धात 490 अधिकार्‍यांना वीरगती प्राप्त झाली तर अनेक जवान शहिद झाले होते.