आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवानाचा सहा सहकार्‍यांवर गोळीबार, 5 ठार; त्यानंतर केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - जम्मू-काश्मीर पासून 20 किलोमीटर अंतरावरील गांदरबल भागात तैनात एका भारतीय जवानाने सहा सहकार्‍यांवर गोळीबार केला आहे. यात पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. एक गंभीर जखमी आहे. सहा सहका-यांवर गोळीबार केल्यानंतर या जवानाने स्वतःलाही गोळी घालून आत्महत्या केली आहे. जवानाने असे का केले, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, लष्कराने या घटनेची पुष्टी केली आहे.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा राष्ट्रीय रायफल 13 चा जवान असून कुमाऊं येथील रहिवासी होता. बुधवारी रात्री त्याची ड्यूटी होती. रात्री दोनच्या सुमारास तो कँम्पमध्ये आला त्यावेळी चार जवान खोलीत झोपलेले होते. त्याने अंदाधूंद फायरिंग सुरु केली. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारच्या बराकीतील जवान धावत आले तर, ते देखील त्याच्या फायरिंगची शिकार झाले. त्यानंतर या जवानाने स्वतःलाही गोळ्या घातल्या.

गोळीबार आणि हत्येच्या घटनेच्या चौकशीसाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चा आदेश देण्यात आला असून जम्मू-काश्मीरचे पोलिसही तपास करीत आहेत.