आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Armyman’s Body Found In Siachen 18 Years After He Went Missing

सियाचिनमध्ये आढळला तब्बल 18 वर्षांपूर्वीच्या शहीद जवानाचा मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सियाचिन- सलतोरा रेंज भागात एका भारतीय जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. गया प्रसाद असे शहीद जवानाचे नाव आहे. प्रसाद यांचा मृतदेह बर्फाच्छदीत भागात आढळून आल्याने यांच्या मृत्यूला तब्बल 18 वर्षे उलटूनही त्यांचा मृतदेह चांगल्या स्थितीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शहीद गया प्रसाद यांचे पार्थिव उत्तर प्रदेशातील कुरारिया गावात पाठवण्यात येणार आहे. तिथे शासकिय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात येणार आहे. प्रसाद यांच्या पश्चात वडील गजाधर सिंह, पत्नी रमा देवी, मुलगा सतीश आणि मुली मीना व मंजू असा परिवार आहे.
उत्तर ग्लेशियरमध्ये गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला. लेहमधील लष्काराच्या रुग्णालयात हे ठेवण्यात आले आहे. गयाप्रसाद यांचा मुलगा सतिश वडिलांचे पार्थिव घेण्यासाठी चंदीगड येथून लेह येथे पोहोचला असल्याचेही लष्कारातील अधिकार्‍यांनी सांगितले.
दरम्यान, सप्टेंबर 1996 मध्ये भारत-पाकिस्तानदरम्यान अधुनमधुन गोळीबार सुरु होता. याच काळात गया प्रसाद बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. खंडा ड्रॉप झोनजवळील एक खोल दरीत गया प्रसाद पडले होते. त्यांना शोधण्यासाठी 'सर्च ऑपरेशन'ही सुरु केले होते. परंतु गया प्रसाद यांचा पत्ता लागला नव्हता. नंतर लष्करातील नियमांनुसार, गया प्रसाद यांना युद्धात ‍वीरमरण आल्याचे सांगून त्यांच्या कुटुंबियांना पेंशन सुरु करण्यात आली होती.
असे आढळले गया प्रसाद यांचे पार्थिव...
गेल्या आठवड्यात गस्त घालणार्‍या भारतीय जवानांना ग्लेशियरमधील बर्फाच्छदीत भागात एक हाथ बाहेर निघालेला दिसला. नंतर जवानांनी बर्फ बाजूला केला असताना त्यांना एक मृतदेह आढळून आला. मृतदेहासोबत सर्व्हिस कार्डही होते. त्यावर गया प्रसाद असे नाव असून 15 राजपूत बटालियन लिहिले आहे.

1984 मध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी सेन्याचा पराभव करून सलतोरा रेंजवर ताबा मिळवला होता. यावेळी भारताचे 900 जवान शहीद झाले होते तर पाकिस्तानचा एकही जवान शहीद झाला नव्हता.