आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arrest Warrant Against Mahendrasingh Dhoni, Latest News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महेंद्रसिंह धोनीला भगवान विष्णुची वादग्रस्त जाहिरात भोवली; कोर्टाने बजावला अटक वॉरंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका वादग्रस्त जाहिरातीवरून अडचणीत सापडला आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्हा कोर्टाने धोनीविरोधात आज (मंगळवार) अटक वॉरंट बजावले. 16 जुलैपर्यंत धोनीला अटक करा, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत. सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाने धोनी विरोधात अटक वॉरंट बजावले.
धोनी विरोधात हिंदूंच्या धर्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी धोनीला यापूर्वी कोर्टाने तीनदा समन्स बजावले होते. मात्र, त्यानंतरही धोनी सुनावणीला कोर्टात हजर झाला नव्हता. त्यामुळे कोर्टाने यावेळी धोनीविरोधात अटक वॉरंट बजावले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, काय आहे प्रकरण....
(फोटो- महेंद्रसिंह धोनीचे जाहिरातीत प्रसिद्ध झालेले छायाचित्र)