आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी शनिवारी फुटीरवादी नेता काझी यासिरला ताब्यात घेतले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- पोलिसांनी शनिवारी फुटीरवादी नेता काझी यासिरला आपल्या डझनभर समर्थकांसह ताब्यात घेतले. त्यांना श्रीनगरच्या कोठीबाग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.
फुटीरवादी नेत्यांना सोडण्याची मागणी करत हा नेता उपोषणाला बसला होता. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्वांना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी यासिर आपल्या समर्थकांसह श्रीनगरमध्ये दाखल झाला. 
 
पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्यांनी कारवाई केली. मसर्रत आलमच्या सुटकेची मागणी यावेळी करण्यात आली. राज्यातील हिंसाचारात काही प्रमाणात घट झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...