आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS एजंट सिराजु बनणार होता भारताचा चीफ, करायचा मुलींचे Brainwash

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांच्या ताब्यात असलेला IS एजंट सिराजुद्दीन. - Divya Marathi
पोलिसांच्या ताब्यात असलेला IS एजंट सिराजुद्दीन.
जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला आयएसआयएसचा एजंट सिराजुद्दीनच्या चौकशीत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. चॅटिंग रेकॉर्डवरून समोर आलेल्या माहितीनुसार तो जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी संघटना आयएसआयएसचा भारताचा चीफ बनणार होता. तसेच सिराजुने मुलींचा एक ग्रुप तयार केला होता आणि तो त्यांचे ब्रेनवॉशही करत होता.

असे करायचा ब्रेनवॉश...
- तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सिराजुद्दीनने व्हॉट्सअप आणि टेलिग्राम अॅपवर मुलींचे वेगवेगळे ग्रुप तयार केले होते. त्यावर तो दहशतवादी हल्ल्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करायचा.
- एटीएसने तरुणींची यादी करून संबंधित राज्यांच्या पोलिस आणि तपास संस्थांकडे दिली आहे. त्यामुळे या मुलींवर लक्ष ठेवता येणार आहे.
- सिराजुद्दीनने ग्रुपमधील अनेक तरुणींचे ISIS साठी ब्रेनवॉशही केले होते.

अशी झाली अटक...
सिराजुला त्याच्या या कामांमध्ये यश मिळण्यापूर्वीच तो NIA च्या जाळ्यात अडकला. सिराजुच्या अटकेचा पाया दोन महिन्यांपूर्वीच कर्नाटकमध्ये रचण्यात आला होता. त्यावेळी त्याठिकाणी ISIS मॉड्युलचा खुलासा झाला होता. त्याच्यानंतरच सिराजु NIA च्या रडारवर आला होता. त्याला देशात दहशतवादी मॉड्युल तयार केल्यानंतर विदेशातून लाखो रुपये मिळणार होते. पण दोन महिने पाळत ठेवल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सिराजू जयपूरमध्ये IOC चा मार्केटींग मॅनेजर बनून IS चे जाळे पसरवण्याचे काम करत होता. शनिवारी मिलिट्री इंटलीजन्सच्या अधिकाऱ्यांनी जवळपास तीन तास त्याची चौकशी केली.

अशी मिळाली सिराजुबाबतची माहिती
दोन महिन्यांपूर्वी यवतमाळमध्ये मशिदीसमोर एका पोलिसावर हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर आरोपी अब्दुल मलिकला महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. त्याच्याकडूनच सर्वात आधी सिराजुचे नाव समोर आले होते. मलिकने NIA समोर खुलासा केला होता की, त्याचे सिराजुबरोबर संबंध आहेत. पण त्यावेळी NIA कडे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे NIA ने दोन महिने सिराजुद्दीनचे ऑनलाईन स्टेटस चेक केले. त्याच्या प्रोफाइलशी संबंधित लोकांची माहिती जमा केली. त्यातून त्याचा खरा चेहरा समोर आला. त्यानंतर राजस्थान एटीएसला माहिती दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. कर्नाटकमधील अनेक मुले मुलीही सिराजुद्दीनबरोबर सोशल अकाऊंटद्वारे जोडलेले होते. विशेष म्हणजे कर्नाटकात गेल्या दोन वर्षांमध्ये IS आणि IM शी संबंधित 27 जण पकडले गेले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा सिराजुचे PHOTOS