आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतानच्या राजघराण्यातील तीनवर्षीय नातू जिग्मी म्हणाला, मी मागील जन्मात नालंदात शिकलो होतो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजगीर (बिहार) - भूतानच्या राजमाता दोजी ओंगचुक शनिवारी प्राचीन नालंदातील भग्नावशेष पाहण्यासाठी नालंदात आल्या. तेथून परतल्यानंतर महाराणींनी सांगितले की, माझा नातू जिग्मी जिटेन ओंगचुक एक वर्षाचा होता तेव्हापासूनच प्राचीन नालंदा विद्यापीठाच्या नावाचा उच्चार करत होता. आधी तर काही समजले नाही, पण जेव्हा थोडा मोठा झाला तेव्हा मागच्या जन्मात आपण तेथे शिकलो असल्याचे त्याने सांगितले. या दौऱ्यात राजमातेसोबत त्यांची मुलगी सोनम देझेन ओंगचुक आणि तिच्या धाकट्या भावासह १६ सदस्यांचे पथक आहे.  

नालंदात मुलाचे शब्द ऐकून थक्क झाले लोक  
नालंदाच्या भग्नावशेषांच्या जागी राजमात कुटुंबीयांसह पोहोचल्या तेव्हा त्यांचा नातू जिग्मी जिटेन ओंगचुक यांनी वेगळाच प्रकार सुरू केला. त्याने तेथील विविध अवशेष आणि संरचनांबद्दल सांगण्यास सुरुवात केली. मागील जन्मात कोणत्या कक्षात अभ्यास केला, हेही त्याने सांगितले. आधी तर त्याने धावत जाऊन कक्षाचे भग्नावशेष शोधले. मी येथेच अभ्यास करत होतो, असे सांगितले. झोपण्याचा कक्षही दाखवला. तो भूतानमध्ये जे सांगत असे तो स्तूप राजमाता, सोबतच्या लोकांनी पाहिल्या. तो तेथे एक रस्ता आणि उंच ठिकाणाबाबतही सांगत होता. येथे येऊन त्याने तेही शोधले. महाराणींनी सांगितले की, भूतानमध्ये त्याने जे सांगितले त्या सर्व गोष्टी येथे दिसत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...