आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कलम 370 वर खुल्या चर्चेस हरकत नाही’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेहराडून - कलम 370 व समान नागरी कायदा या दोन मुद्दय़ांवर खुली चर्चा होण्यास काहीच हरकत नसावी. यातून काहीही नुकसान होणार नाही, असे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह यांनी म्हटले आहे.
जाहीर चर्चा केल्यामुळे काही नुकसान होणार नाही. कलम 370 व समान नागरी कायद्यासंबंधीचे फायदे आणि तोट्यावर बोलण्यात संकोच का बाळगला जावा, असा प्रतिसवाल कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला. आपल्यावरील जबाबदारीबद्दल ते म्हणाले, कृषी खाते माझ्यासाठी नवीन आहे; परंतु दूध उत्पादन वाढवणे, देशभरातील शंभर टक्के कृषी क्षेत्र सिंचनाखाली आणणे इत्यादी ध्येये आम्ही ठेवलेली आहेत. त्यासाठी कृषी क्षेत्राने दूध उत्पादन वाढीचा आराखडा तयार केला आहे.
वाजपेयी सरकारच्या काळात दूध उत्पादनाची पातळी गाठण्यात यश मिळाले होते. दूध उत्पादनाचे हेच प्रमाण पुन्हा गाठण्याचा आमचा प्रयत्न असेल.