आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा : बस 300 फूट खोल दरीत कोसळली, 30 लोक कलावंत ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका वळणावर ड्रायव्हरचे संतुलन सुटले आणि बस दरीत कोसळली - Divya Marathi
एका वळणावर ड्रायव्हरचे संतुलन सुटले आणि बस दरीत कोसळली
ओडिशा - येथील देवगड येथे एक बस दरीत कोसळून 30 जण दगावले, तर अनेक जखमी आहेत. ही घटना देवगड आणि रेमता या दरम्यार रविवारी रात्री घडली. बसमध्ये 40 प्रवासी होती. हे सर्व लोककलावंत होते.

कशी झाली दुर्घटना
- देवगड पोलिस अधीक्षक (एसपी) साराह शर्मा यांनी सांगितले, बसमध्ये 40 कलावंत होते. ते भारतीय गण नाट्य मंडळाचे कलाकार आहेत. ते सर्व बरगड जिल्हातील एका गावात कला सादर करुन देवगडला परतत होते.
- एका वळणावर ड्रायव्हरचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस 300 फूट खोल दरीत कोसळली.
- अनेक जखमी वेळेवर बाहेर पडू शकले नाही आणि त्यांनी तिथेच प्राण सोडले.
- एसपी शर्मांनी सांगितले, ज्या ठिकाणी दुर्घटना झाली तिथे रस्ता अतिशय अरुंद होता.
- मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यासोबत जखमींना तातडीने मदत पोहोचवण्याचे आवाहन केले.
पुढील स्लाइडमध्ये,
>> मदतीला धावले रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान
>> मृतांमध्ये तीन मुली