आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दगडफेक करणारे सत्याग्रही नाहीत; ते तर हल्लेखोर- अरूण जेटली यांची टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काश्मीरमध्ये दगडफेक करणारे आणि त्यांची बाजू घेणाऱ्या पाकिस्तानवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. त्यांनी काँग्रेस आणि फुटीरवाद्यांवरही निशाणा साधला आहे. जेटली म्हणाले,‘दगडफेक करणारे काही सत्याग्रही नाहीत, ते हल्लेखोर आहेत. त्यांचे समर्थन करणे हे घाणेरडे राजकारण आहे.’ काश्मीरप्रश्नी राजकीय तोडगा काढावा, अशी मागणी करणाऱ्या राजकीय पक्षांना उत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेशी कुठलाही समझोता केला जाणार नाही. हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.

जनसंघाचे संस्थापक पंंडित प्रेमनाथ डोगरा यांच्या समैलपूर या गावात तिरंगा रॅलीत जेटली बोलत होते. ते म्हणाले, ‘भारताशी युद्ध झाल्यास आपण जिंकू शकत नाही हे पाकिस्तानला १९९० च्या दशकात कळले होते. त्यामुळे पाकिस्तानने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवणे सुरू केले. पाकिस्तानने २००८ आणि २०१० मध्ये आपल्या छुप्या युद्धाला दगडफेकीचा नवा चेहरा दिला. काश्मीर खोऱ्यातील गंभीर अशांततेच्या मागे पाकिस्तान आणि फुटीरवादी आहेत. पण त्यांचा उद्देश पूर्ण होणार नाही.’ जम्मू भागाच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना जेटली यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांना केली.
‘जखमी सुरक्षा कर्मचाऱ्यांकडेही पाहायला हवे’
जेटली म्हणाले, ‘काही लोक काश्मीरमध्ये मानवी हक्कांचा मुद्दा उपस्थित करतात. ते कधी काश्मीर खोऱ्यात आले आहेत का? ड्यूटीवर असताना जखमी झालेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांनी पाहिले आहे का? संकुचित दृष्टिकोन असणाऱ्या लोकांना हे सर्व दिसत नाही.’ अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने काही दिवसांपूर्वी बंगळुरूत आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशविरोधी घोषणा देणाऱ्यांकडे त्यांचा हा इशारा होता. मानवी हक्काचे समर्थन करणाऱ्यांनी नुसताच कंठशोष करू नये, असे त्यांनी सुनावले आहे.
विरोधी नेते आज मोदींना भेटणार
नवी दिल्ली |काश्मीरमधील विरोधी राजकीय पक्षांचे शिष्टमंडळ सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. काश्मीरमधील बिघडलेल्या स्थितीवर राजकीय तोडगा काढावा, अशी मागणी हे शिष्टमंडळ करणार आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.
एलओसीजवळ ३ दहशतवादी ठार
श्रीनगर| कुपवाडात एलओसीजवळ लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराला घुसखोरीची बातमी रविवारी सकाळी कळली. त्यानंतर ही चकमक झाली. ठार झालेल्या या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘देश तोडण्याच्या घोषणा म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे’
बातम्या आणखी आहेत...