आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थमंत्री अरुण जेटली हरिद्वार येथे हेलिकॉप्टरमध्ये चढताना घसरले, किरकोळ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिद्वार- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली रविवारी हेलिकॉप्टरमध्ये चढताना जखमी झाले. पतंजली फूड पार्कहून दिल्लीला परतताना हेलिकॉप्टरमध्ये चढताना पाय घसरून पडले. त्यांना डोक्याला जखम झाली आहे. मात्र, ती गंभीर नाही. पतंजलीच्या डॉक्टरांनी लगेच त्यांच्यावर उपचार केले. ही दुखापत फार गंभीर नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
 
 
पंतंजलीच्या कार्यक्रमासाठी हरिद्वारमध्ये..
- अरुण जेटली पतंजली योग पीठच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रविवारी हरिद्वारला आले होते.
- तेथून ते दिल्लीसाठी निघाले होते. हेलिकॉप्टरमध्ये चढताना त्यांचा पाय घसरला आणि ते किरकोळ जखमी झाले.
- पडल्यामुळे त्यांना चक्कर आली. त्यानंतर थोडावेळ त्यांनी आराम केला आणि पंतजलीच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले.
बातम्या आणखी आहेत...