आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरुणा-मनोज यांचे नि:शब्द प्रेमभावना विवाह बंधनात अडकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - अरुणा लवकरच मनोजची सहचारिणी होणार आहे. लग्नासाठी दोघांनी नोंदणी कार्यालयात अर्ज सादर केला आहे. दोघे देहबोली व हातवार्‍यांद्वारे एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतील. लोकांच्या लेखी या लग्नास विशेष महत्त्व आहे. त्याचे कारणही तसेच आहे. अरुणा आणि मनोज मूकबधिर आहेत. केवळ हातवारे व देहबोलीतून त्यांचे प्रेम फुलले. त्यांनी आता लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

अरुणाचे लाजणे आणि मनोजच्या चेहर्‍यावरील हास्य दोघे एकमेकांना मनोमन आवडत असल्याचे सांगून जातात. काहीही न बोलता, न ऐकता दोघांत मूक संवाद सुरू होता. यानंतर नि:शब्द प्रेम बहरत गेले. झारखंडच्या हटिया येथील अरुणा कुमारी ऊर्फ बडकी 29 वर्षांची आहे. जमशेदपूरच्या बारीडीह येथील मनोज कुमार तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. दोघांबद्दल मिळालेल्या माहितीमुळे जो-तो त्यांना पाहण्यासाठी उत्सुक होता. नोंदणी कार्यालयातील अधिकार्‍याने अरुणाला विचारले तुला मनोज पसंत आहे काय? त्यावर अरुणा हसली आणि अधिकार्‍याने अर्ज आपल्याकडे ठेवला.


काही न बोलता सर्वकाही सांगितले
नोंदणी कार्यालयामध्ये उत्साही नागरिकांनी मनोजला प्रश्न विचारले. त्याने हातवारे करून उत्तरे दिली. अरुणाचा मी आदर करेन. आम्ही दोघे सारखेच असल्यामुळे आम्हाला एकमेकांच्या भावना चांगल्या समजतील. मला आई-वडील नाहीत. भाऊ विचारत नाही, अशा स्थितीत अरुणाच संपूर्ण कुटुंब असेल, अशी मनोजची भावना होती.
नोंदणी कार्यालयात अरुणा व मनोज.


माझी मुलगी खूप चांगली
वडील किशोरी प्रसाद म्हणाले, माझी मुलगी खूप चांगली आहे. ती सर्वकाही करू शकते. तिला चांगला जोडीदार मिळेल, असे वाटत होते. तोपण एवढा चांगला की वायफळ खर्च टाळण्यासाठी त्याने कोर्टात लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला.


हरहुन्नरी मनोज
मनोजने शारीरिक दुर्बलतेला कमकुवतपणा समजले नाही. तो डोकोमोमध्ये नोकरी करतो. तसेच तो मूकबधिर मुलांना संवादाचे प्रशिक्षणही देतो. मनोज अनेक प्रयत्नांनंतर काही शब्द बोलू लागला आहे. यासाठी त्याच्या वडिलांनी मदत केली.

मूकबधिर अरुणा- मनोजचा नोंदणी विवाहासाठी अर्ज; एक-दीड महिन्यानंतर कोर्टात लग्न