आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Arunachal Pradesh Switcheroo: Congress Loses Chief Minister Pema Khandu To BJP Ally

अरुणाचलच्‍या मुख्यमंत्र्यांसह 43 आमदार पीपीएमध्‍ये डेरेदाखल, राज्य काँग्रेसमुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटानगर - अरुणाचल प्रदेशात यंदा आठ महिन्यांतच चौथे सरकार येण्याची चिन्हे आहेत. दोन महिन्यांपूर्वी सत्तेत परतलेली काँग्रेस पुन्हा बाहेर झाली आहे. मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्यासह पक्षाचे ४३ आमदार पीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल (पीपीए) या प्रादेशिक पक्षात डेरेदाखल झाले आहेत. यामुळे काँग्रेसचे सरकार आता पीपीएचे झाले आहे. भाजपप्रणीत नाॅर्थ इस्ट डेमोक्रॅटिक आघाडीचा पीपीए हा घटकपक्ष आहे.

राज्याच्या ६० सदस्यीय विधिमंडळात काँग्रेसचे ४४ आमदार होते. आता फक्त माजी मुख्यमंत्री नबाम तुकी हेच काँग्रेसमध्ये उरले आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाने जुलैमध्येच तुकी यांना हटवून खांडू यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, आता अख्खे सरकारच काँग्रेसमधून फुटल्याने राज्यातील काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले. राज्यातील उलथापालथीत आमचा काहीही हात नाही, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री व भाजप नेते किरण रिजिजू
यांनी म्हटले आहे.

आता ६ राज्यांत काँग्रेस
देशात आता कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, मेघालय, मिझोराम या ६ राज्यांतच काँग्रेसची सरकारे आहेत. केंद्रशासित प्रदेशांत फक्त पुद्दुचेरीत काँग्रेसची सत्ता आहे.
बातम्या आणखी आहेत...