आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arunachal School Hostel Warden Held For Raping 14 Girls

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षकाने तीन वर्षांत केला 14 अल्पवयीन मुलींवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटानगर - अरुणाचल प्रदेशातील बलात्काराचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील लिकाबाई येथील एका खासगी शाळेच्या हॉस्टेलच्या वॉर्डनवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. शाळेतील 14 अल्पवयीन मुलींवर या नराधमाने बलात्कार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सर्व मुली 4 ते 13 वयोगटातील आहेत.

हे प्रकरण उघड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस स्टेशनला घेराव घालून निदर्शने केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या वॉर्डनला अटक केली आहे. विपिन विसवान असे त्याचे नाव आहे.

शाळेचे प्राचार्य आणि इतर दोन शिक्षकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सांगितले, की बलात्काराच्या घटना या शाळेत गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहेत.