आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरुणाचलच्या विद्यार्थ्याला घरमालकाकडून बेदम मारहाण, बुट चाटायला लावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - येथील एका घरमालकाने अरुणाचल येथील विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आणि त्याच्यासोबत अपमानास्पद वर्तन केले. ही घटना 6 मार्च रोजी घडली असून विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर घरमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालकाने विद्यार्थ्याला बुट चाटायला लावले होते. 
 
पाण्याचा वापर वाढल्याने मारले 
- घरमालक आणि विद्यार्थ्यामध्ये पाणी वापरावरुन वाद झाला. या वादानंतर घरमालक हेमंत कुमार यांनी विद्यार्थी हीगिओ गुंटे याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर हेमंत कुमारने त्याल बुट चाटण्याची जबरदस्ती केली.
- गुंटे हा येथील क्राइस्ट चर्चमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या तक्रारीवरुन हेमंतकुमारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
केंद्रीय मंत्री रिजिजूने घेतली दखल 
- केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थी हीगिओ गुंटेवर घरमालकाने केलेल्या हल्ल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. 
- केंद्रीय गृहखात्याने याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरु केली आहे. 
- रिजिजू हे अरुणाचल प्रदेशचे आहेत. ते म्हणाले, 'अमेरिकेत वर्णवादातून भारतीयांवर हल्ले होत आहेत. असाच प्रकार भारतात होणे खेदजनक आहे.'
बातम्या आणखी आहेत...