आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमपदाचे उमेदवार सिद्धू ,छोटेपूर संयोजक; केजरीवालांचा गुरुवारपासून दौरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड- आम आदमी पार्टीतील पडझड रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल पुढाकार घेणार आहेत. गुरुवारपासून ते पंजाब दौऱ्यावर येणार आहेत. केवळ महिन्यांआधी राजकीय प्रवास सुरू करणारे गुरप्रीत घुग्गी यांना सुच्चा सिंह छोटेपूर यांच्या जागी पंजाब आपचे संयोजक म्हणून नियुक्त केले आहे.

घुग्गींनी १० फेब्रुवारी रोजी आपमध्ये प्रवेश केला होता. व्हॅटिकन सिटीमध्ये केजरीवाल यांनी सप्टेंबर रोजी पंजाबची निवडणूक सांभाळण्यासाठी जात असल्याचे म्हटले आहे. ते तिथे चार दिवस राहतील. सर्वांत आधी त्यांच्याकडून नाराज नेते-कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल. मात्र, कार्यकर्त्यांची नाराजी वाढत आहे. सुच्चा सिंह छोटेपूर बाहेर पडल्यामुळे पक्षाची व्होटबँक त्यांच्यासोबत गेली.

परमिंदर बरियाणा चंदिगड
नवीनपक्षाची स्थापना करणारे नवज्योतसिंह सिद्धू, परगट सिंह यांनी आपच्या संयोजक पदावरून बाजूला करण्यात आलेले सुच्चा सिंह छोटेपूर यांना आवाज-ए- पंजाब पक्षात प्रवेशाची ऑफर दिली आहे. छोटेपूर यांच्याशिवाय परगट सिंह यांनी भविष्यात एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धू यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले जाईल, तर त्यांना संयोजक केले जाऊ शकते, अशी माहिती छोटेपूर यांना देण्यात आली आहे. िसद्धू यांच्यामुळे येथील समिकरण बदलू शकते. छोटेपूर यंानीही आवाज-ए- पंजाबच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यांनी सोबत येण्याची तयारी दर्शवली आहे. रविवारी झालेल्या बैठकीत आपने सोडलेला छोटेपूरचा समर्थक दोन्ही पक्षांमध्ये मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात येते.
घुग्गीच का?
छोटेपूरयांना पायउतार करताना हिंमत सिंह शेरगिल यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी गुरप्रीत घुग्गी यंाच्या नावावर शिक्कामोर्तब केला. पक्षाला वादग्रस्त नसलेल्या चेहऱ्याबरोबर संपूर्ण पंजाबमध्ये लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्त्व हवे होते.

नऊऐवजी तारीख का?
अरविंदकेजरीवाल याआधी सप्टेंबर रोजी पंजाब दौऱ्यावर येणार होते. मात्र, सिद्धू, परगट सिंह आणि बैंस बंधूंनी नव्या आघाडीची घोषणा केल्यानंतर केजरीवाल यांनी एक दिवस आधी दौरा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते सभेऐवजी भेटीगाठी घेतील.
बातम्या आणखी आहेत...