आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Election Visit In Karnataka Raise Fund Of 20000 In Dinner

काही चॅनल्सनी पैसे घेऊन गुजरातचा खोटा प्रचार केला, बंगळुरुत केजरी'वार'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु - आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज (शनिवार) बंगळुरुच्या दौ-यावर आहेत. येथेही त्यांनी मीडियावर आगपाखड केली आहे. मीडियातील भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकण्याच्या वक्तव्यावर ते कायम आहेत. बंगळुरुमध्ये रोड शो दरम्यान, ते म्हणाले, 'काही चॅनल्सनी मोदींशी हातमिळवणी करुन गुजरातच्या विकासाच्या खोट्या बातम्या दिल्या आहेत. मीडियातील अशा भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे.'
महाराष्ट्रानंतर आता केजरीवाल कर्नाटक दौ-यावर गेले आहेत. दोन दिवसांच्या या दौ-याची सुरवात त्यांनी बंगळुरुमधून केली आहे. येथे त्यांनी रोड शो केला. त्यानंतर रात्री डिनर पार्टी होणार आहे. पक्षाला 20 हजार रुपये देणगी देणा-यांना त्यांच्यासोबत भोजनाचा अस्वाद घेता येणार आहे. 16 मार्च रोजी ते बंगळुरुमध्ये सभेला संबोधित करतील. दिल्ली नंतर उर्वरित देशातील मेट्रो शहरांवर लक्ष्य असलेला आप कर्नाटकात सर्वच्यासर्व 28 लोकसभेच्या जागा लढविणार असल्याची चर्चा आहे.
डिनर पार्टीसाठी 250 देणगीदारांना निमंत्रण
बंगळुरुमध्ये केजरीवालांच्या डिनर पार्टीसाठी 250 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. या डिनर पार्टीतून पक्षासाठी 50 लाखांहून अधिक निधी जमा होण्याची अपेक्षा आहे. आपला पक्ष निधी देणा-या चार अव्वल राज्यांपैकी कर्नाटक एक आहे.