आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगार अन्सारींशी केजरीवालांची हातमिळवणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाराणसीमधून नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना मुख्तार अन्सारी यांच्याशी हातमिळवणी करण्यात काहीही गैर वाटत नाही. अनेक हत्येचे आरोप असलेले अन्सारी सध्या तुरुंगात आहेत. गेल्या निवडणुकीत अन्सारी केवळ 17 हजार मतांनी पराभूत झाले होते. केजरीवाल यांनी अमृतसर दौर्‍यावर असताना ते म्हणाले, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांना पराजित करण्यासाठी कोणत्याही ताकदीचे समर्थन घेण्याची आमची तयारी आहे. मुख्तार अन्सारी यांचे भाऊ अफझल अन्सारी यांनी दिल्लीत केजरीवाल यांची भेट घेतली आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

‘आप’मध्ये दोन मते- अन्सारी यांचे समर्थन घेण्यावरून आपमध्ये मतभेद दिसून आले आहे. पक्षाचे नेते आशुतोष यांनी त्याला विरोध केला आहे. त्यावरून गोंधळ झाल्यानंतर आम्ही कुणाचा पाठिंबा घेतलेले नाही. अशी सारवासारव त्यांनी केली.

स्पष्टीकरण दिले : मी पळपुटा नाही, राजीनाम्याची वेळ चुकली- 'राजीनाम्याचा निर्णय घेण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करायला हवी होती. त्यामागील कारण सांगण्यासाठी जाहीर सभा घ्यायच्या होत्या. त्यानंतर सरकार सोडता आले असते. तत्काळ घेतलेला निर्णय आणि जनतेशी कमी झालेल्या संवादामुळे भाजप-काँग्रेसला माझ्यावर पळपुटा असा ठपका ठेवण्याची संधी मिळाली. मी चूक केली. भविष्यात याविषयी अधिक सतर्कता घेतली जाईल.'

दोन प्रकारचे लोक आमच्यावर नेहमी नाराज- आपच्या राजीनाम्यावरून दोन प्रकारचे लोक सरकारवर नाराज आहेत. पहिले आमचे समर्थक आहेत. दुसर्‍या प्रकारातील लोक केजरीवालांना सीएम आणि मोदींना पीएम म्हणून पाहू इच्छितात. मोदींना सरळ टक्कर देणे या लोकांना आवडलेले नाही. हे लोक माझ्यावर संतापलेले आहेत.