आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाबरल्यामुळे मोदी दोन जागांहून उभे - अरविंद केजरीवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहतक - आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना ढांसा सीमा हरियाणा येथे तीन दिवसांचा रोड शो सुरू केला. या वेळी त्यांच्या निशाण्यावर मोदीच होते. ते म्हणाले, मी वाराणसीला गेलो होतो. तेथे मोदींची लाट नाही. मोदी मला घाबरले आहेत. त्यामुळेच दोन ठिकाणांहून निवडणूक लढवत आहेत. मोदींमध्ये क्षमता असेल तर केवळ वाराणसीमधून निवडणूक लढवून दाखवावी. येथे त्यांची थेट माझ्याशी लढत आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. हुडा शेतकर्‍यांच्या जमिनी हिसकावून रॉबर्ट वढेरा आणि मुकेश अंबानींना देत आहेत; पण त्यांच्याविरोधात बोलायला सगळे घाबरतात, असे ते म्हणाले.

अद्दल घडवण्याची वेळ
केजरीवाल म्हणाले, तुमचे मत या वेळी बदल घडवू शकते. केवळ आपच सिस्टिम बदलू शकते. भाजप आणि काँग्रेसचे नेते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोघांनाही अद्दल घडवण्याची वेळ आली आहे.