आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal News In Marathi, Congress, Voters, Captain Sharma, Divya Marathi

काँग्रेसने मतदारांना वळवण्यासाठी कॅप्टन शर्मा यांना दिले 500 कोटी - केजरीवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेठी - आम आदमी पार्टीचे संयोजक केजरीवाल यांचे म्हणणे आहे की, काँग्रेस-भाजपला मत देणे म्हणजे देश व देवाशी प्रतारणा होईल. काँग्रेस-भाजपवाले पैसे वाटतात. मतदारांनी पैसे दोघांकडून अवश्य घ्यावेत, पण मत ‘आप’ला द्यावे. मतदारांचे मन वळवण्यासाठी काँग्रेस पाचशे कोटी रुपयांपर्यंत खर्च करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कॅप्टन सतीश शर्मांना 200 ते 500 कोटी रुपये पाठवले आहेत. मतदारांना साड्या, घड्याळे व पैंजण वाटले जात आहेत. पैसे दोन्ही पक्षांकडून घ्या, पण मत मात्र आम आदमी पक्षालाच द्या. दिल्लीतही झोपडपट्टीवाल्यांनी सगळ्यांकडून पैसे घेतले, पण मते झाडूला दिली.

कुमार विश्वास जिंकत आहेत. । एका सर्वेक्षणानुसार आताच निवडणूक झाल्यास कुमार विश्वास यांना 47 टक्के, राहुल गांधी यांना 34 आणि स्मृती इराणी यांना 9 ते 10 टक्के मते मिळतील.
भाजपवाल्यांनी कुमार विश्वास यांची मते खाण्यासाठी स्मृती इराणींना अमेठीला पाठवले आहे. राहुल अमेठीत काँग्रेसचे नाहीत, भाजप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार आहेत.