आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होय, वाराणसीतून मोदींना आव्हान देणार -केजरीवाल; पाहा वाराणसीचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडून आले तर देशातील लोकांना आत्महत्या करावी लागेल, असे वक्तव्य आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) वाराणसीमध्ये रॅलीला संबोधित करताना केले. दरम्यान, वाराणसी येथून लोकसभा निवडणूक रिंगणार उतरणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
भाजप आणि कॉंग्रेसवर हल्ला करताना केजरीवाल म्हणाले, की नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही अंबानी आणि अडानी यांचे एजंट आहेत. नरेंद्र मोदी यांनी गॅसचे दर दुप्पट करण्यासंदर्भात केंद्राला पत्र लिहिले आहे. मोदी जर सत्तेत आले तर जिवनावश्यक वस्तुंच्या किमती चौपटीने वाढतील. लहान उद्योगधंदे बंद करून त्याजागी मोठ्या उद्योग समुहांना मोकळीक देण्याचा कट रचला जात आहे.
अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) सकाळी वाराणसीमध्ये दाखल झाले. येथे आल्यानंतर त्यांना भाजप समर्थकांच्या विरोधाचा सामना करावा लागला. दुपारी त्यांनी 'रोड शो' सुरुवात केली आहे. रोड शो दरम्यान केजरीवाल यांच्यावर काळी शाई फेकण्यात आली. त्यामुळे त्यांच्या रोड शोमध्ये थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. टीम केजरीवाल आता सभास्थानी दाखल झाली आहे. त्यांच्या सोबत मनीष सिसोदिया, संजय सिंह, कुमार विश्वास आहेत. सभास्थानी केजरीवाल यांच्या डोक्यावर गांधीटोपी नाही. येथे आपच्या एका मस्लिम कार्यकर्त्याने त्यांच्या डोक्यावर टोपी ठेवली. वाराणसीमधी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे. त्यासोबतच दलितांच्या मतांवर त्यांचा डोळा आहे. येथील विणकरांकडेही केजरीवालांचे लक्ष आहे. थोड्याच वेळात केजरीवाल यांच्या भाषणाला सुुरुवात होईल.
केजरीवाल यांच्या कार आणि समर्थकांवर फेकली अंडी
वाराणीसत आल्यानंतर ते गंगास्नान करण्यासाठी राजघाटवर गेले. तेथून काल भैरव मंदिरात दर्शनासाठी गेले. तेव्हा मंदिराबाहेर भाजप समर्थकांनी त्यांच्या विरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांच्या कारवर आणि समर्थकांवर अंडी फेकण्यात आली.
गंगेचे पाणी दूषित होत असल्यावर केली चर्चा
अरविंद केजरीवाल यांनी संकट मोचन मंदिराचे महंत विश्वंभर मिश्रा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गंगेच्या प्रदुषणावर चर्चा केली. भाजप आणि काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले, 'मोदी एनडीएचे तर राहुल गांधी यूपीएचे बादशाह आहेत. दोघांनीही वृत्तवाहिन्या विकत घेतल्या आहेत. मी वाराणसीत पंतप्रधान होण्यासाठी नाही तर, देश बदलण्यासाठी आलो आहे.'
थोड्याच वेळात त्यांच्या सभेला सुरुवात होणार आहे. मंचावर केजरीवालांचे आगमन झाले आहे. यावेळी ते वाराणसीमधून भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवू की नको, याची विचारणा करणार आहेत.
देशाला वाचवण्यासाठी वाराणसीत आलो - केजरीवाल
गंगा स्नान झाल्यानंतर केजरीवाल म्हणाले, 'देशाला वाचवण्यासाठी वाराणसीत आलो आहे. हा देश वाचला तर, दिल्ली वाचेल.'
मोदी आणि राहुल गांधींवर निशाणा
केजरीवाल दिल्लीहून रेल्वेने वाराणसीला आले. वाराणसीच्या कँट रेल्वेस्टेशनवर आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. 'शीला दिल्ली में हारी है, अब मोदी की बारी' अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसर दणाणून सोडला होता.
वारणसीमध्ये दाखल झाल्याबरोबर केजरीवालांनी नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, 'मोदी-राहुल दोन्ही बादशाह आहेत, या निवडणूकीत दोघांचा पराभव करणे गरजेचे आहे.' मोदींविरोधात लढणार का? या प्रश्नावर ते म्हणाले, 'पहिले जनतेचे मत जाणून घेणार आणि त्यानंतर निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेणार.'

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवाल यांचा वाराणसी दौरा