आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणा प्रताप यांचे वंशज, अरविंद सिंग मेवाडांकडे रोल्स रॉयस ते मर्सिडीजपर्यंत कार कलेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर- महाराणा प्रताप यांचे वंशज आजही राजस्थानात वास्तव्य करत आहेत. अरविंद सिंग मेवाड यांनी विदेशात शिक्षण घेतले. त्यांच्याकडे रोल्स रॉयस ते मर्सिडिजपर्यंतच्या अनेक कार आहेत. ते 72 वर्षांचे असून उदयपूरमध्ये फॅमिलीसोबत राहात आहेत. विशेष म्हणजे अरविंद सिंग मेवाड यांच्या कार्याची दखल 'मॅनचेस्टर इव्हनिंग न्यूज'ने घेतली आहे.

मेवाड राजघराण्याचे 76 वे संरक्षक...
- उदयपूर राजघराण्याचे सदस्य अरविंद सिंग हे मेवाड घराण्याचे 76 वे संरक्षक आहे. त्यांचे वडील भगवत सिंग यांनी 1955 ते 1984 या काळात मेवाड घराण्याचे नेतृत्त्व केले होते. अरविंद सिंग यांचे शिक्षण मेयो कॉलेजमध्ये झाले. नंतर त्यांनी ब्रिटनमधून हॉटेल मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली.

विंटेज कारचे चाहाते...
- विंटेज कारचे चाहते असलेले अरविंद सिंग यांच्याकडे अनेक रोल्स रॉयस गाड्या आहेत. सर्व गाड्यांवर मेवाडच्या राजघराण्याचे प्रतिकचिन्ह लावण्यात आले आहे. त्यांच्याकडे एमजी टीसी,1939 कॅडिलेक कन्व्हर्टेबल आणि मर्सडीजचे अनेक मॉडल्स आहेत.
- ते नेहमी नव्या गाड्यांच्या लॉन्चिंगला दिसतात. अनेक गाड्या खास मेवाडच्या राजासाठी डिझाइन केल्याचे बोलले जाते. लक्झरी गाड्या सामान्य नागरिकांना निहाळता याव्यात म्हणून, राजघराण्याचे खास व्यवस्था केली आहे.

महाराणा प्रताप यांचे वंशज अरविंद सिंग यांच्याकडे आहे या लक्झरी‍ कारचे कलेक्शन... पाहा  पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...