आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेवाड राजघराणे वंशजाच्या लक्झरी गाड्या, रोल्स रॉइसपासून मर्सिडिजने सजले गॅरेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उदयपूर - राजस्थानची धरती राजे-महाराजे आणि राजपूतांची धरती म्हणून ओळखली जाते. मोठ-मोठ्या किल्ल्यांमध्ये राहाणारे राजे-महाराजे आलिशान जीवनशैलीचे भोक्ते राहिलेले आहे. यांच्या ताफ्यात रोल्स रॉइस सारख्या अनेक लक्झरी गाड्या देखिल राहात होत्या. असेच एक राजघराणे राजा भगवतसिंह यांचे. पूर्वाश्रमीचे राजे भगवतसिंह यांचे चिरंजीव अरविंदसिंह याचा 13 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com सांगत आहे अरविंद सिंह यांच्याबाबतच्या रोचक गोष्टी.
अरविंद सिंह मेवाड घराण्याचे 76 वे संरक्षक आहेत. त्यांचे वडील भगवत सिंह यांनी 1955 ते 1984 दरम्यान मेवाड घराण्याचा कारभार पाहिला. अरविंद सिंह यांचे शिक्षण मेयो कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटच्या शिक्षणासाठी ते ब्रिटनमध्ये गेले. याच दरम्यान त्यांनी शिकागो आणि यूएसमध्ये नोकरी केली. त्यांचा विवाह कच्छची राजकुमारी विजयाराजेंसोबत झाले. आता ते एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. याची निर्मिती त्यांच्या वडिलांनी केली होती.

लक्झरी गाड्यांची आवड
लक्झरी कार जमवणे हा अरविंद सिंह यांचा छंद आहे. त्यांच्याकडे अनेक रोल्स रॉइस आहेत. या सर्व गाड्या मेवाडच्या राजांची ओळख मानली जाते. त्यांच्याकडे एक एमजी टीसी, 1939 कॅडिलेक कन्व्हर्टेबल आणि मर्सिडीजचे तर अनेक मॉडेल्स आहे. गाड्यांची आवड असलेले अरविंद सिंह अनेकवेळा गाड्यांच्या लॉन्चिग प्रोग्रामला हजेरी लावत असतात. असेही म्हटले जाते की काही गाड्या खास मेवाडच्या राजांसाठी डिझाइन केल्या गेल्या होत्या. राजघराण्याच्या लक्झरी गाड्या सर्वसामान्यांना पाहाता याव्या याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मेवाडच्या राजांच्या लक्झरी गाड्यांचे कलेक्शन
बातम्या आणखी आहेत...