आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाचे अमेरिकन अरविंद सुब्रमण्यम बनणार सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अरविंद सुब्रमण्यम
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अर्थतज्ज्ञ अरविंद सुब्रमण्यम यांना सरकारच्या मुख्य आर्थिक सल्लागार पदासाठी निवडले आहे. अद्याप त्यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. अर्थमंत्री अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने ही घोषणा करण्यात आलेली नाही. पंतप्रधान कार्यालयाने एका महिन्यापूर्वीच अर्थ मंत्रालयाकडे सुब्रमण्यम यांचे नाव पाठवले होते. सध्या सुब्रमण्यम पीटरसन इन्स्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल इकोनॉमिक्स विषयाचे सीनिअर फेलो आहेत.

सरकारमधील एका उच्चस्तरीय सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान आणि अर्थ मंत्री यांच्यात गेल्या एका महिन्यापासून याबाबत निर्णय रखडला आहे. वित्तमंत्री आजारी असल्याते याला विलंब झाला आहे. एका महिन्यापूर्वीच जेटली यांची गॅस्ट्रीक बायपास सर्जरी झाली होती. गेल्या आठवड्यात त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. लवकरत त्यांना सुटी देण्यात येणार आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार ही हाय प्रोफाइल पोस्ट आहे. या पदावरील व्यक्ती वार्षिक आर्थिक सर्वेक्षण करण्यास जबाबदार असतो. त्याच्या मदतीने राज्यांच्या गरजांनुसार बजेट तयार केले जाते. वर्षाच्या मध्यापर्यंत तयार होणारा हा अहवाल संसदेत सादर केला जात असतो. जेटली त्यांचे पहिले पूर्ण बजेट फेब्रुवारी 2015 मध्ये सादर करणार आहेत.
जेटलींच्या बजेटवर केली होती टीका
सुब्रमण्यम यांचे शिक्षण भारत आणि ब्रिटनमध्ये झाले आहे. त्यांनी आयएमएफ आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गेनायजेशन (WTO) साठी काम केले. त्याआधी ते अमेरिकेत हार्वर्ड आणि जॉन्स होपकिन्स या विद्यापीठांत वरिष्ठ पदांवर होते. नुकतीच त्यांनी भारत सरकारच्या डब्ल्यूटीओ करारातून माघार घेण्याच्या मुद्यावर टीका केली होती.