आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aryan Choudhari News In Marathi, Disease, Kolkata, Divya Marathi

असाध्य आजाराचा देशातील एकमेव रुग्ण असल्याचे दु:ख, उपचारांसाठी सव्वा कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता - सहाव्या इयत्तेत शिकणारा आर्यन चौधरी शाळेत तर जातो, मात्र दप्तरातून वह्या-पुस्तके काढण्यापासून त्याला प्रत्येक प्रश्न समजावून सांगण्यापर्यंतचे सर्व काम त्याची आस्था नावाची मैत्रीणच करते. मात्र जवळच असलेल्या आई दुर्गेच्या मंदिरात ड्रमसेट वाजवताना पाहून त्याची बोटे कडक झाली आहेत, यावर कुणाचा विश्वासही बसणार नाही. ड्रमस्टिक एकदा बोटात अडकवल्यावर ती हलूच शकत नाही. त्यामुळे तो सहजपणे ड्रमसेट वाजवू शकतो.


जन्मानंतर तीन वर्षांपर्यंच आर्यन सामान्य मुलांप्रमाणेच होता. एकदा शिक्षकांनी त्याला लिहिताना त्रास होत असल्याची तक्रार केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे सांगितले.
सीएमसी वेल्लोर आणि दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयातही आर्यनवर उपचार झाले. आर्यनला हंटर सिंड्रोम नावाचा आनुवंशिक आजार झाला आहे. जगात हा आजार फक्त दोन हजार रुग्णांना आहे अणि भारतात आर्यन एकमेव. वेळीच पूर्ण उपचार झाले नाहीत, तर त्याचा जीव वाचवणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. इलस्ट्रेस-आयव्ही इंजेक्शन हा त्यावर एकमेव उपचार आहे. त्याचा खर्च वर्षाला सव्वा कोटी रुपये आहे. वीस हजार रुपये महिना कमावणा-या आर्यनचे वडील शिवशंकर चौधरी यांच्यासाठी हे शक्य नाही.


आर्यनच्या वयासोबत त्याच्या आजाराची तीव्रताही वाढत आहे. आता तर त्याच्या चेह-यावरील स्नायूही आखडले आहेत. हात पूर्णपणे वाकतही नाहीत आणि एकदम सरळही होत नाहीत. बारा वर्षांचा आर्यन कोणतेही काम करू शकत नाही. हाताने जेवणही करू शकत नाही. पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून. वयानुसार त्याचा मानसिक विकासही होऊ शकला नाही. तो बोलूही शकत नाही. त्याच्या यकृताचा आकार अनेक पटींनी वाढला आहे. चेह-याचा आकारही सारखा बदलत असतो. आता तर त्याची उंचीही खुंटली आहे.


डॉ. अपूर्व घोष सांगतात, अशा प्रकारची ही पहिली केस आहे. लवकरात लवकर आर्यनवर योग्य उपचार सुरू झाले नाहीत तर त्याचे दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर दिसून येत आहेत. सध्या तो शाळेत जातो. मुलांसोबत हसतो, खेळतो. मात्र वय वाढण्याबरोबर त्याचे शरीर आखूड होत जाईल. नंतर तो बिछान्यावरून उठूही शकणार नाही. उपचार सुरू केले तरी आर्यन पूर्ववत होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागतील. हा आजार असलेल्या रुग्णांचे आयुष्य 10 ते 20 वर्षांचेच असते.