आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaduddin Owaisi Hosts Iftar Party Today In Up To Boost Mim

रमजानमध्ये ओवेसींचा अॅक्शन प्लॅन, आजपासून MIM ची UP मध्ये इफ्तार पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश) - हैदराबादनंतर महाराष्ट्रात झेंडा रोवलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लमिनने (AIMIMI) रमजानच्या निमीत्ताने आता उत्तर प्रदेशात बस्तान बसवण्याची योजना आखली आहे. त्या दृष्टीने पक्षाने योजना तयार केली आहे. एमआयएम उत्तर प्रदेशात इफ्तार पार्टीचे आयोजन करणार आहे. याची सुरुवात मेरठ येथून होणार आहे. या पार्टीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असद्दुदीन ओवेसी उपस्थित राहाणार आहेत. इफ्तारला जास्तीत जास्त लोकांना बोलावून उत्तर प्रदेशातील राजकारण समजून घेण्याची ओवेसींची योजना आहे. या माध्यमातून पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठीचे ते काम करणार आहेत.
एमआयएमचे उत्तर प्रदेशातील को-ऑर्डिनेटर शौकत अली यांनी सांगितले, की सध्या राज्यातील दोन शहरांमध्ये इफ्तार पार्टी होईल. त्यानंतर इतर शहरांमध्ये आयोजन केले जाईल. इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होऊन ओवेसी पक्ष कार्यकर्त्यांसोबत चर्चा करतील.
का देत आहे इफ्तार पार्टी
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये विधानसभा निवडणूक आहे. ओवेसी त्या दृष्टीने राज्यात पाय रोवण्याचा प्रयन्न करत आहेत. त्यांच्या पक्षाने अलाहाबाद, आग्रा, आजमगढ, मेरठ आणि फैजाबाद यांसारख्या शहरांमध्ये सभांच्या आयोजनासाठी परवानगी मागितली आहे. मात्र, राज्यातील अखिलेश यादव सरकारने अद्याप त्यांना परवानगी दिलेली नाही. या प्रकरणी एमआयएमने कोर्टाचे दार ठोठावले आहे. याची जुलै महिन्यात सुनावणी होणार आहे. जाहीर सभांना परवानगी मिळत नसल्याने ओवेसींनी इफ्तार पार्टीतून लोकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रातून दोन आमदार
हैदराबाद आणि आंध्र प्रदेशपर्यंत मर्यादित असलेला पक्ष आता महाराष्ट्रात चांगला स्थिरावला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाने 24 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांनी अनेक ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर देत औरंगाबाद आणि भिवंडीतून प्रत्येकी एक उमेदवार निवडून आणले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत त्यांचे दोन प्रतिनिधी तर औरंगाबाद महापालिकेत 25 नगरसेवक आहेत. या विजयामुळे औवेसींचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनी जाहीर केले होते, की आता उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालवर फोकस केला जाईल.