आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaduddin Owaisi Said Embracing Islam Will Be Real Home Coming

'इस्लाम स्विकारणे खर्‍या अर्थाने 'घरवापसी', प्रत्येक मूल हे मुस्लिम म्हणून जन्माला येते'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- देशभर वाहत असलेले धर्मांतराचे वारे 'घरवापसी' ची चर्चा पेटवत असताना मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या चर्चेत उडी घेत इस्लाम हेच जगातील सर्व धर्मांचे माहेर असल्याचा दावा केला. इतर धर्माचे सर्व लोक जेव्हा इस्लाम स्वीकारतील तीच खरी घरवापसी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी 'घरवापसी'च्या प्रक्रियेवर नवे तत्त्वज्ञान मांडले. ते म्हणाले, 'प्रत्येक मूल हे मुस्लिम म्हणून जन्माला येते, परंतु पालक त्याचे धर्मांतर करतात. 'मिलाद-उन-नबी' निमित्त शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात ओवेसी बोलत होते. ओवेसी यांनी जगभरातील दहशतवादाचा निषेध केला. झकी-उर-रहेमान लख्वी आणि हाफिज सईदविरुद्ध कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
संपूर्ण जगाची संपत्ती एकत्र केली तरी, मुस्लिमांना विकत घेता येणार नाही
ओवेसी म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) 'घरवापसी' नावाने एक कार्यक्रम सुरु केला आहे. या कार्यक्रमानुसार मुस्लिमांना पाच लाख रुपये आणि ख्रिश्चनांना दोन लाख रुपयांचे आमिष दिले जात आहे. ते म्हणाले, मुस्लिमांना तुम्ही पाच लाख काय जगाची सगळी संपत्ती दिली तरी एकही मुस्लिम इस्लाम सोडू शकत नाही.
ओवेसी भारत आमचा पितृदेश असल्याचे सांगत म्हणाले, मानवी इतिहासातील श्रेष्ठ लोकांनी भारतातच जन्म घेतला होता.
मोदी शांत का?
ओवेसींनी मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, घरवापसीच्या मुद्यावर मोदींची शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते. मोदींनी परदेशातील काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, तो कधी येणार याची देश वाट पाहात आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, भारत हिंदू देश, हिंदू संकटात सापडला तर देशही संकटात सापडेल