आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaduddin Owaisi Says Mim Will Contest Bihar Polls

बिहारच्या आखाड्यात ओवेसींची उडी, मुस्लिम भागात देणार उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असदुद्दीन ओवेसी - Divya Marathi
असदुद्दीन ओवेसी
पाटणा - एमआयएम (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांचा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. एमआयएम सीमांचल भागात उमेदवार उभे करणार आहे. किती जागा लढवणार हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. एमआयएम कोणत्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचेही ओवेसी यांनी सांगितले आहे. बिहारमध्ये पाच टप्प्यात निवडणूक होणार असून सीमांचल भागात 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

बिहारच्या सीमांचल भागात पूर्णिया, सहरसा, किशनगंज, मधेपुरा, कटिहार, अररिया यांचा समावेश होतो. याच भागातून निवडणूक लढवण्याचा ओवेसींचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बिहारमधील सीमांचल भाग दुर्लक्षीत राहिलेला आहे. विकासाचा प्रवाह येथील नागरिकांपर्यंत आजपर्यंत पूरेसा पोहोचलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीमांचल भाग मुस्लीम बहुल आहे. किशनगंज येथे 48 टक्के मतदार मुस्लीम आहे. याशिवाय कटिहार येते 45, अररिया 38 आणि पूर्णियात 35 मतदार अल्पसंख्याक आहे.

सीमांचल भागात किती जागा
या भागात विधानसभेच्या 38 जागा आहेत. पूर्णियामध्ये 24 आणि कोसीमध्ये 13 विधानसभेच्या जागा आहेत.

जेडीयू-आरजेडीने केले दुर्लक्ष्य
जनता दल संयुक्तचे (जेडीयू) नेते के.सी. त्यागी म्हणाले, मतदारांनी सहा महिन्यांपासून आपले मत तयार केले आहे. नितीशकुमारच त्यांच्या नजरेपुढे आहेत. त्यांनाच ते विजयी करणार आहेत. एमआयएमचा राज्यात परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) मनोज झा यांनी ओवेसी मुस्लिम मतांचे धृवीकरण करतील हे अमान्य केले आहे. ते म्हणाले, ओवेसींच्या बिहारमधील प्रवेशाने मुस्लिम मतदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. खरी लढत महाआघाडी आणि एनडीए यांच्यातच होईल.

ओवेसींचा सीमांचलवरुन नितीशकुमारावर निशाणा
ओवेसींनी कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी करणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले. त्यांनी सीमांचल भाग दुर्लक्षित राहाण्याला मुख्यमंत्री नितीशकुमार आणि आरजेडी नेते लालू यादव जबाबदार असल्याचा हल्ला चढवला. या भागाचे मागासलेपण ही सत्ताधाऱ्यांची देण असल्याचे ते म्हणाले. केंद्रातील भाजप सरकारवर आणि पंतप्रधान मोदींच्या फसव्या पॅकेजचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले, केंद्र सरकार जर सीमांचलच्या विकासासाठी गंभीर असते तर त्यांनी या भागासाठी घटनेच्या कलम 371 नूसार विशेष विकास समिती स्थापन केली असती.
पुढील स्लाइडमध्ये, एमआयएमचा बिहारमध्ये परिणाम कसा