आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापुंचा बेकायदेशीर आश्रम जमिनदोस्त, नाशिकमध्ये समर्थकांवर लाठीचार्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीलवाडा - अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म करण्याच्या आरोपात जोधपूर जेलमध्ये असलेले आसाराम यांच्या भीलवाडामधील हरणी खूर्द येथील आश्रमावर आज (गुरुवार) बुलडोझर फिरवण्यात आला. हा आश्रम सरकारी जागेवर उभारण्यात आला होता. तहसीलदारांनी बुधावारी आश्रम ट्रस्टला या जागेवरून बेदखल करण्याचे आदेश दिले होते 2.19 बिघा भूखंड ट्रस्टने बळकावला होता. पीठासीन अधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी ट्रस्टला सरकारी जमीनीवर अतिक्रमण केल्या प्रकरणी दोषी ठरवून शासकीय किंमतीच्या 50 पट रक्कम दंड ठोठावला आहे. हरणी कला पटवारी यांनी या प्रकरणी तहसील कोर्टात ट्रस्टच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

आश्रमाच्या संचालकांनी मागितली होती मुदत
आश्रमाचे संचालक कैलाश शर्मा यांच्यासह साधुंनी वकीलांसह तहसील कोर्टात नोटीसचे उत्तर सादर केले. त्यात म्हटले, की ट्रस्टचे मुख्य कार्यालय अहमदाबाद येथे आहे. जमीनीची कागदपत्र तेथून मागवावी लागणार आहेत. तसेच कोर्टाच्या फाईलची नक्कल काढायची आहे. त्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी. मात्र, कोर्टाने त्यांना मुदत देण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण
आसाराम यांच्या ट्रस्टने आठ बीघा जमीनीवर आश्रम उभारला होता. यातील जवळपास चार बीघा जमीनीवर अतिक्रमण केलेले होते. यातील काही जमीन ही शेतीसाठीची होती. त्यातही ट्रस्टने कोणताही बदल न करता आश्रम उभारला होता.

सरकारी जागेवर ध्यान कुटी
या आश्रमात ध्यान कुटी, साधक निवास, स्वंयपाकघर, शिव मंदिर, साहित्य मंदिर, सत्संग भवन होते. हे सर्व शासकीय जागेत बांधण्यात आले होते.

नाशिकमध्ये आसाराम समर्थकांवर लाठीचार्ज

नाशिकमधील गंगापूर रोडवरील आश्रमाचे बेकायदेशीर बांधकाम पाडायला आज अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी गेले होते. यावेळी समर्थकांनी या कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. त्यांच्या कामात व्यत्यय आणला. त्यामुळे पोलिस पथकाला बोलविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आसाराम बापुंच्या समर्थकांवर लाठीचार्ज केला.

श्रीमंतांचे महाल थिटे पडतील असे आहेत आसाराम बापुंचे आश्रम...पुढील स्लाईडवर क्लिक करा...