आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामांविरुद्ध आज चार्जशीट; सहकार्‍यांनाही कोर्टात हजर करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसारामबापू आणि त्यांच्या सहकार्‍यांवर बुधवारी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयात सर्वांना हजर केले जाण्याची शक्यता आहे.

छिंदवाडा येथील गुरुकुलाचे संचालक शरश्चंद्र, हॉस्टेल वॉर्डन शिल्पी, सेवादार शिवा, स्वयंपाकी प्रकाश हे जोधपूर मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. बापूंनाही 25 ऑक्टोबरला गुजरातहून आणण्यात आले.