आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Accused Of Rape, Trafficking In Chargesheet

अत्याचार प्रकरण: आसारामांवर चार्जशीट जन्मठेपेचीही कलमे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- अत्याचार प्रकरणात आसाराम बापूंविरुद्ध जोधपूर पोलिसांनी बुधवारी आरोपपत्र दाखल केले आहे. दंड संहितेच्या 14 कलमांनुसार बापूंना आरोपी करण्यात आले आहे. यात त्यांना जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

जोधपूर मध्यवर्ती कारागृहात असलेले आसारामबापू आणि त्यांच्या चार साथीदारांना बुधवारी पोलिसांनी सत्र न्यायालयात हजर केले. पोलिसांनी आरोपपत्रात 58 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. आरोपपत्र दाखल करण्यात आल्यानंतर सर्व आरोपींची 16 नोव्हेंबरपर्यत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 16 रोजी आरोपपत्रातील आरोपांवर युक्तिवाद होणार आहे.

पोलिसांनी ठेवलेले सर्व आरोप खोटे आहेत, आपल्याला फसवले जात असल्याचे आसारामबापू यांनी न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले. बापूंना जोधपूर पोलिसांनी इंदूर येथील आश्रमातून 31 ऑगस्ट रोजी रात्री अटक केली होती. तर इतर चार आरोपींना नंतरच्या काही आठवड्यात अटक करण्यात आले होते. छिंदवाडा आश्रमातील गुरुकुलात शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आसारामबापू यांच्यावर होता. 20 ऑगस्ट रोजी बापूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आसारामबापूंवरील आरोप
0376 (2)फ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार 0376 टोळके तयार करून अत्याचार 0342 एखाद्याला जबरदस्तीने ओलीस ठेवणे 0354 अ महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा 0506 एखाद्याला धमकावण्याचा गुन्हा 0 109 चुकीचे काम करण्यासाठी चिथावणी 0370 (4) अत्याचारासाठी एखाद्याला एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाणे

हे पाच आरोपी
1. आसाराम : मुख्य आरोपी
2. शिल्पी : छिंदवाडा आश्रमाची वॉर्डन
3. शरतचंद्र : छिंदवाडा आश्रमाचा संचालक
4. प्रकाश : आसाराम यांचा स्वयंपाकी
5 शिवा : आसाराम यांचा सेवेकरी