आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Always Met Many Women, Follwer Shiva Say

तरुणी सेवेक-यांवर भाळू नये म्‍हणून कुरुप व्‍यक्तीलाच ठेवायचे आसाराम जवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसाराम यांचे मुख्य सेवेकरी शिवा यांनी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. आसाराम अनेक महिलांना एकांतात भेटत होते, असा दावा शिवाने केला आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथील शिष्य व त्यांची मुलगी जोधपूरला येणार असल्याची पूर्वकल्पना शिवाने आसाराम यांना दिली होती.
विद्यार्थिनीवर कुठल्या पुरुषाचे भूत बसल्याचे सांगत तिला जोधपूरला बोलावण्यात आले होते, असे शिवाने पोलिसांना सांगितले. शिवा यांच्यामार्फत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, आयएएस, आयपीएस अधिकारी आसाराम यांच्याशी मोबाइलवर संभाषण केले जात होते. शिवाच्या चौकशीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाच्या गौप्यस्फोटामुळे पोलिस आसाराम यांची पुन्हा कोठडी मागू शकतात.

जामीन फेटाळला
लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूंना जोधपूर न्यायालयाने बुधवारी जामीन फेटाळला. सरकारी पक्षाने त्यांच्या जामिनाला जोरदार विरोध दर्शवला. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी दोन दिवसांच्या सुनावणीनंतर जामीन अर्ज फेटाळला. बचाव पक्षाने एफआयआर व वैद्यकीय अहवालावर केलेला युक्तिवाद नाकारण्यात आला. सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.