जोधपूर - लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम यांची जामीन याचिका आज (सोमावर) जोधपूर हायकोर्टाने पुन्हा फेटाळली आहे. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील गुरुकुलमधील विद्यार्थीनीचे जोधपूरच्या आश्रमात लैंगिक शोषण केल्याचा आसाराम यांच्यावर आरोप आहे. त्यांनी याआधीही जामीनासाठी अर्ज केला होता. जोधपूर हायकोर्टाच्या न्यायाधीश निर्मलजीत कौर यांनी त्यांचा अर्ज फेटाळला आहे.
आसाराम यांच्यावर गेल्यावर्षी 4 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री मणाई गावातील आश्रमात आपल्याच गुरुकुलमधील विद्यार्थीनीला एक षडयंत्र आखून बोलावून घेतल्याचा आणि तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. हॉस्टेलची वॉर्डन आणि संचालकांच्या मदतीने मुलीला जोधपूरला बोलावून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपात 1 सप्टेंबर 2013 पासून आसाराम जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत.
आसाराम यांनी याआधी 1 ऑक्टोबर 2013 रोजी याच कोर्टासमोर केलेला जमीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आसाराम यांच्यावतीने ज्येष्ट विधीज्ञ जेठमलानी, कर्नाटक हायकोर्टातील वकील नागेश यांनी युक्तीवाद केला.