आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गौतम बुद्धांसोबत स्‍वतःची तुलना करतात आसाराम बापू, पोलिसांनी आवळला फास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- एकांतवासाच्‍या नावाखाली अल्‍पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्‍याचा आरोपात अडकलेले आसाराम बापू स्‍वतःची तुलना भगवान गौतम बुद्धांसोबत करु लागले आहेत. बुद्धांवरही अशाच प्रकारचे आरोप झाले होते. मलाही अशाच आरोपांचा सामना करावा लागत आहे. सत्‍य लवकरच समोर येईल, असे आसाराम बापू म्‍हणाले.

आसाराम बापू स्‍वतःची तुलना बुद्धांसोबत करत असले तरीही त्‍यांच्‍याभोवती पोलिसांचा फास आवळल्‍या जात आहे. कोणत्‍याही क्षणी त्‍यांना अटक होण्‍याची शक्‍यता आहे. पोलिसांनी त्‍यांच्‍याविरुद्ध भक्‍कम पुरावे गोळा केले आहेत. जोधपूर आणि फार्म हाऊसवर पीडित मुलीच्‍या वास्‍तव्‍याबाबत पोलिसांनी पुरावे गोळा केले आहेत. आता नवी माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी फार्म हाऊसमधील ज्‍या खोलीत होते, तिथे फार्म हाऊसच्‍या मालकालाही जायची परवानगी नव्‍हती. पोलिसांनी पीडित मुलीला त्‍या ठिकाणी नेले असता तिने खोलीतील प्रत्‍येक वस्‍तू आणि आतमधील माहिती तंतोतंत खरी सांगितली. तिने बाहेरुनच कोणती वस्‍तू कुठे आहे, भिंतींचा रंग कसा आहे, आत कोणती चादर आहे, इत्‍यादी माहिती तिने बाहेरुनच सांगितली. पोलिसांनी आत जाऊन पडताळणी केली असता सर्व माहिती सत्‍य असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले.

फास आवळला... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...