आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Get 14 Days Judicial Custody, Bail Today

आसारामबापूला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप असलेले आसारामबापू यांना न्यायालयाने सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भंवरीकांडातील राजस्थानचे बडतर्फ मंत्री मदेरणा यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीतच आसारामबापू यांची रवानगी झाली आहे. रविवारी त्यांना एका दिवसाच्या पोलिस रिमांडमध्ये ठेवले होते. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होईल.


पोलिसांनी आसारामबापूंना सायंकाळी 4:25 वाजता न्यायालयात हजर केले. पोलिस चौकशी पूर्ण झाल्याचे राजस्थानचे अतिरिक्त महाधिवक्ते आनंद पुरोहित यांनी सांगितले. यानंतर जोधपूरचे सत्र न्यायाधीश मनोजकुमार व्यास यांनी त्यांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.


‘नकली बापू’ने माध्यमांना चकवले : आसारामबापूंना कोर्टात नेताना पोलिसांनी माध्यमांना चांगलेच चकवले. एका बोलेरोत नकली, तर एसटीएफच्या वाहनात असली बापूंना पाठवले गेले. वाहनातून ते उतरल्यानंतर हलकल्लोळ उडाला. आसारामबापू, पोलिस, वकिलांना कोर्टात प्रवेश करण्यात अडचणी आल्या. कोर्टाने 10 मिनिटांत आसारामबापूंना तुरुंगात पाठवले. दीड तासानंतर पोलिस-जमावात चांगलीच जुंपली, लाठीमारही झाला. पोलिसांनी 100 समर्थकांना ताब्यात घेतले.


तुरुंगाचेच भोजन
आसारामबापूंना घरचे जेवण देण्याची विनंती कोर्टाने फेटाळली. ते आजारी असून आवश्यक उपचारांची व्यवस्थेची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. यावर तुरुंगात आधीपासूनच सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.


लवकरच चार्जशीट
डीसीपी अजय लांबा म्हणाले की, प्राथमिक चौकशी पूर्ण झाली आहे. आरोपीविरुद्ध आमच्याकडे सज्जड पुरावे असून खटलाही मजबूत आहे. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल.


कलम 376 सेक्शन
8 कायम राहणार
आसारामबापूंवरील आरोपपत्रात लावल्या जाणा-या कलमांची माहिती ‘दिव्य मराठी नेटवर्क’ला मिळाली आहे. प्राथमिकरीत्या दंड विधानाच्या 376 कलमातील आठव्या उपकलमानुसार त्यांच्यावर आरोप लावले जातील. यात त्यांना अत्याचार नव्हे तर ‘अत्याचाराची पातळी गाठलेला आरोपी’ संबोधले जाईल. यानुसार 10 वर्षांपर्यंतची कैद होऊ शकते. सूत्रांनुसार, पीडितेने जबाबात लिहिले आहे की, आसाराम यांचे कृत्य ‘अत्याचाराच्या पातळीपर्यंत’ पोहोचले होते. या आधारे पोलिस आरोपपत्रात स्पष्ट केले जाईल की, पीडितेच्या ‘लेबिया मेजोरा’पर्यंत झालेले हे कृत्य अत्याचाराच्याच श्रेणीत येते. फौजदारी कायदा 2013 नुसार ते कृत्य भारतीय दंड विधानाच्या 376 कलमाचाच गुन्हा समजले गेले आहे. यातच पोलिस आठव्या उपकलमाचाही गुन्हा झाल्याचे सांगतील. यात किमान 10 वर्षे शिक्षा. प्रसंगी जन्मठेपही शक्य.