आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu In Jail Coolidge Are Bail Application

अटकेतील सर्व सेवेकर्‍यांनी सोडली आसारामबापूंची साथ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- आसारामबापू यांचे सेवेकरीही आता त्यांच्यापासून दुरावले आहेत. बापूंच्या सेवेसाठी आपण ते कैदेत असेपर्यंत तुरुंगातच राहू, असे म्हणणार्‍या या मंडळीने आता जामिनासाठी अर्ज केले आहेत. सोमवारी यावर सुनावणी होत आहे. मीडियावर हल्ला केल्याप्रकरणी बापूंचे 26 सेवेकरी सध्या तुरुंगात आहेत. बापूंना अटक होण्यापूर्वी एका महिलेसह 11 जणांना तर बापूंना अटक झाल्यानंतर 15 जणांना पोलिसांनी अटक केली. बापू सुटतील, अशी या सेवकर्‍यांना खात्री होती. मात्र, आता आशा मावळत चालली आहे. दरम्यान, प्रमुख सेवेकरी शिवा यास न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.