आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Judicial Custody Ends Today; Cops To Submit Chargesheet

आसाराम यांना जन्मठेपेत टाकणार पोलिस! 1300 पानांचे आरोपपत्र दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले आसाराम यांच्याविरुद्ध जोधपूर पोलिसांनी तपास पूर्ण केला असून आज (बुधवार) आसाराम यांच्यासह इतर आरोपींविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी 1300 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात आसाराम यांच्याविरोधात अशी काही कलमे लावण्यात आली आहेत की, त्यांना जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
पोलिस आयुक्त बीजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, आसाराम यांच्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणात अटकेत असलेले आसाराम, सेवादार शिवा, गुरुकुलचे संचालक शरतचंद्र, हॉस्टेलची वॉर्डन शिल्पी आणि स्वंयपाकी प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप आहेत. हे सर्व आरोपी केंद्रीय कारागृहात असून त्यांना आज (बुधावार) जोधपुर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

याआधी गुजरातहुन जोधपूरला आणल्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी आसाराम आणि त्यांच्या सहका-यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा न्यायलयीन कोठडीत एका दिवसाची वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. 26 ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता होती. मात्र काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे आरोपपत्र दिवाळीनंतर दाखल केले जाईल असे सांगितले गेले. त्यामुळे कोर्टाने आसाराम आणि त्यांच्या साथीदारांची न्यायालयीन कोठडी 6 नोव्हेंबर पर्यंत वाढवली होती.

पुढील स्लाइडमध्ये, दिवाळीच्या दिवशी आसाराम यांनी घेतले तुरुंगातील भोजन