आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांचा सवाल : माझ्या जामिनात स्पेलिंग कुठे चुकले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- लैंगिक शोषणाच्या आरोपात २१ महिन्यांपासून जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात असलेले आसाराम बापू जामिनासाठी कासावीस झाले आहेत. गुरुवारी हजेरीसाठी आणले असता कोर्टाबाहेर ते म्हणाले, सलमानला जामीन मिळाला. त्याच्याकडे जादू आहे. माझ्याकडे ती नाही. तो २० मिनिटेही आत गेला नाही. लगेच जामीनही मिळाला. माझ्या जामिनात स्पेलिंग चुकीचे होते, असे वाटते.

साक्षीदारांवर कोण हल्ले घडवत आहे? असे विचारले असता ते म्हणाले की, मला जामीन मिळावा असे न वाटणारेच हल्ले घडवत आहेत. माझ्यावर आरोप करत आहेत. हल्ले करणाऱ्यांना देवाने सुबुद्धी द्यावी. मी हल्ला केला तर मला दहापट शिक्षा द्या