आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Rejected To Give Blood, Say Are Going To Narkotest?

आसाराम बापूला भीती एड्सची, ब्लड देण्यास नकार; नार्को टेस्टचेही भय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अत्याचाराच्या आरोपाखाली आठ दिवसांपासून अटकेत असलेल्या आसारामबापू यांची कोर्टाच्या आदेशाने सोमवारी वैद्यकीय चाचणी झाली. दीड तास चाललेल्या या चाचणीच्या वेळी कधी कुशंकेने, तर कधी भीतीने बापूंची गाळण उडाली. रक्ताचा नमुना देण्यासही त्यांनी नकार दिला. इंजेक्शन पाहताच ते म्हणाले, पोलिस मला भलतेच इंजेक्शन टोचतील. माझी नार्को टेस्ट तर घेतली जात नाही ना, असे भीतभीतच त्यांनी वैद्यकीय पथकाला विचारले.

पोलिसच नव्हे, तर माध्यमांचीही त्यांना भीती वाटत होती. मीडियावाले मला एड्स झाल्याच्या बातम्याही पसरवतील, असे ते म्हणाले. एमआरआय स्कॅनसाठी आत गेलेले बापू पुरुष कर्मचार्‍यांशी तुरळकच बोलले. महिला कर्मचार्‍यांना म्हणाले, तुम्ही मला मुलीसारख्या आहात. एमआरआय करून बाहेर येताच पोलिसांनी त्यांना परत तुरुंगात नेले.