आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu Sexual Harassment Case Narayan Sai Press Conference

आसाराम यांच्या प्रकरणावर सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांना धमकीचे पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटकेत असलेले आसाराम यांच्या प्रकरणावर ज्या सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे, त्या जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मनोजकुमार व्यास यांना 'याचे परिणाम भोगावे लागतील' अशी पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे. न्यायाधीश व्यास यांच्या सुचनेनंतर जोधपूर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली असून पत्र पाठवणार्‍याचा शोध सुरु केला आहे.

आसाराम प्रकरणाचा तपास करणार्‍या जोधपूर पोलिसांना अशा प्रकारचे धमकीचे पत्र याआधीपासून मिळत असल्याची माहिती आहे. पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, न्यायाधीश व्यास यांना पोस्टकार्डद्वारे धमकी देण्यात आली आहे. पत्रात लिहिले आहे की, आसाराम यांना तुरुंगात पाठवून पाप केले आहे. त्यांची लवकर सुटका केली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. हे पत्र कर्नाटकमधील गुलबर्गा येथून पोस्ट करण्यात आले आहे. या पत्राचा तपास करण्यासाठी ते पोलिस आयुक्तांकडे पाठवण्यात आले आहे.

वडीलांना भेटण्यासाठी नारायण साई तुरुंगात

आसाराम यांना भेटण्यासाठी त्यांचे चिरंजीव नारायण साई जोधपूर सेंट्रल जेलमध्य गेले होते. गुरुवारी दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान नारायण साई यांनी तुरुंग अधिका-यांकडे भेटीचा अर्ज दाखल केला. तुरुंग अधिकार्‍यांच्या कक्षामध्ये पिता-पुत्र एकमेकांसमोर आले तेव्हा, नारायण साई भावूक झाले होते. जवळपास 45 मिनीटांची ही भेट होती. यावेळी आसाराम यांच्या चेहर्‍यावरही बैचीनी स्पष्ट दिसत होती. तुरुंग अधिकारी समुंदरसिंह त्यावेळी तिथेच उपस्थित होते. दोघांनी बराच वेळ चर्चा केली. त्यानंतर आसाराम यांचे दोन भक्त त्यांना भेटण्यासाठी आले.