आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापुंविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा मागे, लैंगिक शोषणाचे प्रकरण दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/जोधपूर- आसाराम बापुंभोवती पोलिसानी चौकशीचा फास आवळला आहे. अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍काराच्‍या आरोपासंदर्भात त्‍यांना पोलिसांनी समन्‍स बजावला असून चौकशीसाठी 30 ऑगस्‍टला जोधपूर पोलिसांसमोर हजर राहण्‍याचे निर्देश दिले आहेत. आसराम बापुंना जोधपूर पोलिसांनी समन्‍स बजावल्‍यानंतर आता काहीसा दिलासा दिला आहे. त्‍यांच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा मागे घेण्‍यात आला असून लैंगिक शोषणाचा गुन्‍हा वर्ग करण्‍यात आला आहे. जोधपूर पोलिसांच्‍या एका वरिष्‍ठ निरिक्षकाने अहमदाबाद येथील आसाराम बापुंच्‍या आश्रमात जाऊन समन्‍स सोपवला. आसाराम यांच्‍यासह 4 सहका-यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.

बलात्‍काराच्‍या आरोपांवरुन होणा-या टीकेनंतर आसाराम बापू बचावाच्‍या पावित्र्यात आले आहेत. आसाराम बापू यांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. ती मुलगी माझ्या नातीसारखी आहे. 15 ऑगस्टला तिच्यासोबत होतो, परंतु काहीही चुकीचे वागलो नाही. दोषी असेन तर आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा गळाभेट घ्या, असे आसाराम बापूंनी सांगितले.